शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराऐवजी ३ रुग्णांना रस्त्यावर फेकले; मिरजमध्ये दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 04:47 IST

तीन रुग्णांना उपचार न करता सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकून दिल्याबद्दल व त्यातील एकाचा नंतर मृत्यू झाल्याने रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मिरज (सांगली) : मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तीन रुग्णांना उपचार न करता सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकून दिल्याबद्दल व त्यातील एकाचा नंतर मृत्यू झाल्याने रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक अनिल नरसिंगकर व सफाई कर्मचारी सागर साळोखे अशी त्यांची नावे आहेत. नरसिंगकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.शंकर शिंदे, पीरसाब मोमीन व शिवलिंग कुचनुरे या रुग्णांना उपचार न करता रुग्णालयाबाहेर टाकून दिल्याचा प्रकार २ नोव्हेंबरला उघड झाला. सांगलीतीलजुन्या कुपवाड रस्त्यावर अंधारात तीन अत्यवस्थ रुग्ण पडल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी संजयनगर पोलिसांत माहिती देऊन तिघांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान कुचनुरे यांचा मृत्यू झाला. यादरम्यान मिरज शासकीय रुग्णालयातून तिन्ही रुग्णांना दुसºया रुग्णालयात नेत असल्याचे सांगून, सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालय प्रशासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर अत्यवस्थ रुग्णांना विनापरवाना बाहेर टाकणाºया वैद्यकीय कर्मचाºयांविरुद्ध वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता भोसले यांनी शुक्रवारी रात्री गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली होती.