शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या मदतीऐवजी भाजप आंदोलनात मग्न : पृथ्वीराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:18 IST

एकीकडे सत्तेत असणारे कॉँग्रेस, राष्टवादी, शिवसेना हे घटक पक्ष संकटात लोकांसाठी धावून जात असताना, भाजप नेत्यांना केवळ राजकारण करण्याव्यतिरिक्त काही करता आले नाही.

ठळक मुद्देसत्ता नसल्याने विरोधकांना पोटशूळ

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक संकटात असताना त्यांना मदत करण्याऐवजी भाजपचे राज्यातील व स्थानिक नेते, आमदारही राजकारण व आंदोलन करण्यात मग्न आहेत, अशी टीका कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, पालकमंत्री जयंत पाटील, कॉँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी वैयक्तिक पातळीवर संकटातील लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परप्रांतीयांसाठी कदम यांनी रेल्वे व संबंधित लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. कॉँग्रेसचे स्थानिक कार्यकर्तेही लोकांची मदत करीत आहेत. एकीकडे सत्तेत असणारे कॉँग्रेस, राष्टवादी, शिवसेना हे घटक पक्ष संकटात लोकांसाठी धावून जात असताना, भाजप नेत्यांना केवळ राजकारण करण्याव्यतिरिक्त काही करता आले नाही. लोकांना मदत करण्याऐवजी आंदोलन करून वातावरण कलूषित करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. सत्तेत नसल्यामुळे त्यांना पोटशूळ उठला आहे.

राज्यातील भाजप नेत्यांनी राजकारण करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे अनुकरण आता स्थानिक भाजप नेतेही करू लागले आहेत. आमदार सुधीर गाडगीळ हे स्वत: व्यापारी आहेत. तरीही त्यांनी व्यापा-यांना कोणतीही मदत केली नाही. मदतीऐवजी ते केवळ सत्ताधारी पक्षावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत.पाटील म्हणाले की, आंदोलन लोकशाहीतील अधिकार असला तरी, कोणत्यावेळी आंदोलन करावे, याचे भानही भाजपला राहिलेले नाही. लोक संकटात असताना त्यांना राजकारण केलेले आवडत नाही. तरीही भाजप संकटात राजकारण करीत आहे.

टॅग्स :BJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस