महावीरांच्या २१ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना
By Admin | Updated: January 4, 2015 00:57 IST2015-01-04T00:52:37+5:302015-01-04T00:57:44+5:30
महावीरांच्या २१ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना

महावीरांच्या २१ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना
मिरज : म्हैसाळ-कागवाड रस्त्यावर महावीर व्रती आश्रमात भगवान महावीर यांच्या २१ फूट उंच भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी म्हैसाळ, कागवाडसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आचार्य शीतल सागरजी महाराज यांनी गुरू सन्मती सागरजी महाराज यांच्या आज्ञेने उभारलेल्या चाळीस फूट उंचीच्या कमळ स्वस्तिक मंदिरावर भगवान महावीरांच्या भव्य मूर्तीची क्रेनच्या सहाय्याने प्रतिष्ठापना करण्यात आली. म्हैसूर परिसरातील कोणूर येथून आणण्यात आलेल्या पंचवीस टन वजनाच्या पांढऱ्या मार्बल पाषाणात जयपूर येथील रामअवतार या शिल्पकाराने सहा महिन्यांत भगवान महावीरांची भव्य मूर्ती साकारली आहे. नातेपुते येथील वैभव दोशी या दाम्पत्याच्याहस्ते मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी आचार्य चंद्रप्रभू सागर, प्रशांत सागर, गणिती आर्यिका उपस्थित होते. मे महिन्यात पंचकल्याण महोत्सवाचे होणार आहे. (वार्ताहर)