शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: इंधन चोरीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचा निरीक्षक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 11:44 IST

रेल्वे वॅगनमधून इंधन चोरीबाबत गुन्हा दाखल न केल्याचा ठपका

सांगली : मिरज येथे रेल्वे वॅगनमधून इंधनाची चोरी झाली असतानाही त्याबाबत गुन्हा दाखल न केल्याचा ठपका ठेवत रेल्वे सुरक्षा दलाच्या निरीक्षकांना प्रशासनाने निलंबित केले. महेंद्र पाल असे अधिकाऱ्याचे नाव आहे. मिरज येथे वॅगनमधून हजारो लिटर इंधन चोरीस गेल्याचा प्रकार घडला होता. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.मिरज शहरात इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम या दोन कंपन्याचे ऑईल डेपो आहेत. यातून पाच जिल्ह्यांना इंधनाचा पुरवठा करण्यात येतो. या डेपोमध्ये रेल्वेच्या वॅगनमधून पेट्रोल आणि डिझेल आणण्यात येते.गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर मार्गावरून एक वॅगन इंधन घेऊन मिरजेत आली होती. ऑईल डेपोमध्ये वॅगनमधून इंधन काढून घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात फरक असल्याचे निदर्शनास आले. अधिक तपासणीत १० ते १२ हजार लिटर इंधन चोरीला गेल्याची बाब समोर आली होती. हा प्रकार लक्षात येताच इंधन कंपनीकडून रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाने या तक्रारीची वेळेत दखल घेतली नव्हती. तसेच इंधन चोरीचा प्रकार गंभीर असतानाही त्याबाबत वरिष्ठांना तत्काळ माहिती देण्यात आली नाही असा ठपका महेंद्र पाल यांच्यावर ठेवण्यात आला होता.वरिष्ठ कार्यालयाने याची दखल घेत तपासात दिरंगाई, वरिष्ठांना घटनेची माहिती न देणे हा ठपका ठेवत रेल्वे सुरक्षा निरीक्षक महेंद्र पाल यांना निलंबित केले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन कायम असणार आहे. प्रभारी निरीक्षक म्हणून सतवीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंग यांच्याकडून या प्रकरणाचा तपासही होणार आहे.

मिरज येथील चंदनवाडीजवळ असलेल्या ऑईल डेपोमधून यापूर्वीही इंधन चोरीचे प्रकार घडले आहेत. याबाबत पोलिसांसह सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाईही केली होती. पण, या प्रकरणात थेट अधिकाऱ्यालाच निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे