Sangli: शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी समितीकडून खानापूरच्या जागेची पाहणी

By शरद जाधव | Published: January 9, 2024 05:34 PM2024-01-09T17:34:39+5:302024-01-09T17:35:18+5:30

विटा/खानापूर : शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर येथे होणाऱ्या उपकेंद्राच्या जागेची पहाणी मंगळवारी उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीने केली. यावेळी समितीने खानापूर येथे प्रत्यक्ष ...

Inspection of Khanapur site by Committee for Shivaji University sub centre | Sangli: शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी समितीकडून खानापूरच्या जागेची पाहणी

Sangli: शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी समितीकडून खानापूरच्या जागेची पाहणी

विटा/खानापूर : शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर येथे होणाऱ्या उपकेंद्राच्या जागेची पहाणी मंगळवारी उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीने केली. यावेळी समितीने खानापूर येथे प्रत्यक्ष जाऊन उपलब्ध राष्ट्रीय महामार्गालगतची जागा, पाण्याची व्यवस्था, दळणवळण सुविधा यासह विविध गोषींचा विचार करून ही जागा उपकेंद्रासाठी योग्य असल्याचे मत नमूद केले. यावेळी अभिसभा सदस्य माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व सौ. मेघाताई गुळवणी यांनी खानापूर येथे टेंभू योजनेच्या जुन्या बंद असलेल्या इमारतीत जूनपासून विद्यापीठ उपकेंद्राचे काम तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावे, अशी मागणी केली.

खानापूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र होण्याबाबत अधिसभा सदस्यांच्या बैठकीत प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर उपकेंद्राबाबत नेमलेल्या समितीचे सदस्य आज, सकाळी खानापूरात दाखल झाले. त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुहास शिंदे यांच्यासह शिवसेनेचे दादा भगत यांनी समितीचे स्वागत केले. त्यानंतर समितीने उपलब्ध असलेल्या तेथील जागेची पहाणी केली. पाण्याची व्यवस्था, दळणवळण, महामार्गालगतची जागा याची पहाणी करून ही जागा उपकेंद्रसाठी योग्य असल्याचे सांगितले.

त्यानुसार समितीचा अहवाल विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर दि. १५ जानेवारीपर्यंत ठेऊन त्याची मान्यता घेऊन सिनेट, उपकेंद्र समितर व्यवस्थापन परिषदेचा एकत्रित अहवाल राज्य शासनाकडे सादर करून उपकेंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही होणार असल्याची माहिती सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव पाटील यांनी दिली.
दरम्यान, खानापूरच्या टेंभू कार्यालयातील वापरात नसलेल्या इमारतीची पहाणीही यावेळी समितीने केली.

उपकेंद्र सुरू करताना सुरूवातीच्या काळात तेथील इमारत वापरणे संबंधीचा प्रस्ताव शासनास देऊन येत्या जूनपासून हे उपकेंद्र खानापूर येथे सुरू करण्यासाठी समिती प्रयत्नशील राहील, अशी माहिती शिवाजी विद्यापीठा अभिसभा सदस्य अ‍ॅड. वैभव पाटील यांनी दिली. या समितीत प्राचार्या डॉ. मेघाताई गुळवणी, डॉ. रघुनाथ डमकले, अ‍ॅड. स्वागत परूळेकर, अ‍ॅड. वैभव पाटील, श्रीमती काव्याश्री नलवडे, संजय परमणे, विशाल गायकवाड, डॉ. प्रशांत खरात सहभागी झाले होते.

Web Title: Inspection of Khanapur site by Committee for Shivaji University sub centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.