इनरव्हील क्लब ऑफ मिडटाऊनची वृद्धाश्रमास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:58+5:302021-01-08T05:28:58+5:30

इनरव्हील क्लब ऑफ मिडटाऊनच्या बेळगाव येथील डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट डॉ. ज्योती पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी आश्रमाचे अध्यक्ष ...

Inner Wheel Club of Midtown Old Age Home Assistance | इनरव्हील क्लब ऑफ मिडटाऊनची वृद्धाश्रमास मदत

इनरव्हील क्लब ऑफ मिडटाऊनची वृद्धाश्रमास मदत

इनरव्हील क्लब ऑफ मिडटाऊनच्या बेळगाव येथील डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट डॉ. ज्योती पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी आश्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमातच इनरव्हील क्लब ऑफ मिडटाऊनचा कार्यक्रम झाला. डॉ. ज्योती पाटील यांनी इनरव्हील क्लबच्या महिला सदस्यांना मार्गदर्शन केले. इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट जया जोशी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. शरद पाटील यांनी इनरव्हील क्लबच्या कार्याचा गौरव केला. सेक्रेटरी ॲड. सुजाता कुलकर्णी यांनी अहवालाचे सादरीकरण केले. प्रा. सुलभा तांबडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्योती पाटील यांच्या हस्ते क्लबच्या सदस्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेविका कल्पना कोळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी क्लबच्या प्रेसिडेंट जया जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जोशी यांनी हास्यप्रयोग सादर केले. कार्यक्रमाचे संयोजन क्लब प्रेसिडेंट जया जोशी, नंदिनी पाटील, संजीवनी पाटील यांच्यासह क्लबच्या सदस्यांनी केले.

फाेटाे : ०७ कुपवाड १

Web Title: Inner Wheel Club of Midtown Old Age Home Assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.