शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

सुरुलमध्ये महिलेचा अज्ञाताकडून खून

By admin | Updated: December 22, 2016 23:50 IST

डोक्यात हातोडा घातला : दागिने, रोकड ‘जैसे थे’

इस्लामपूर : सुरुल (ता. वाळवा) येथे शेतवस्तीवरील घरी एकट्याच राहणाऱ्या महिलेचा खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. कमल महादेव पाटील (वय ५८, रा. सुरुल) असे तिचे नाव आहे. बुधवारी रात्री ते पहाटे दरम्यान हा खून झाला. अज्ञाताने डोक्यात लोखंडी हातोडा व दगड घालून खून केला असून, कारणही अज्ञातच आहे. मृत महिलेच्या अंगावरील दागिने व घरातील रोख रक्कम सुरक्षित होती. त्यामुळे खुनाचे गूढ वाढले आहे.कमल पाटील सुरुलच्या मळी नावाच्या शेतातील घरात राहत होत्या. सुरुल हे त्यांचे माहेर, तर करमाळे (ता. शिराळा) हे सासर आहे. पती महादेव पाटील यांच्या निधनानंतर त्या सुरुल येथे स्थायिक झाल्या. त्यांना शंकर नावाचा मुलगा होता. त्याने दोन लग्ने केली होती. त्याच्या दुसऱ्या पत्नीबरोबर मृत कमल पाटील यांची कुरबूर होत असे. त्यामुळे भाऊ सर्जेराव पाटील यांच्या शेतातील घरी कमल राहत होत्या. मुलगा शंकर याचेही आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वस्तीशेजारील चुलत चुलते प्रकाश राजाराम पाटील यांनी मोबाईलवरून कमल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती भाचा अभिजित याला दिली. त्यानंतर पाटील कुटुंबीयांनी वस्तीवर येऊन पाहिल्यानंतर ही खुनाची घटना उघडकीस आली. भाचा अभिजित पाटील याने पोलिसांत अज्ञाताविरुद्ध खुनाची फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)श्वानाकडून मागाचा प्रयत्नकमल पाटील यांच्या खुनातील संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सांगलीच्या श्वानपथकाला पाचारण केले होते. घटनास्थळावरील लोखंडी हातोड्याचा वास दिल्यानंतर हे श्वान सुरुल गावच्या दिशेने ओढ्यापर्यंत ५0 मीटर अंतरावर जाऊन तेथेच घुटमळले.