शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

ऑनलाईन कथावाचन उपक्रमात मानव-बिबट्या यांचे सहजीवनावरील माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 15:58 IST

Wildlife Leopard Sangli : कोरोनामुळे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आलेल्या आय.यु.सी.इन ग्लोबल युथ समित ( IUCNGlobal Youth Summit 2021) या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या कथावाचन उपक्रमात शिराळा मधील प्लॅनेट अर्थ फौंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील यांनी मानव-बिबट्या यांचे सहजीवनावरील माहिती सादर केली. या परिषदेत १२० देशातील बारा हजारपेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. सेंटर फॉर लार्ज लँडस्केप कंझर्वेशन या संस्थेने आयोजित केलेल्या रहा कथा वाचन उपक्रमात होता.१३ देशातून कथांची निवड करण्यात आली होती. 

ठळक मुद्दे ऑनलाईन कथावाचन उपक्रमात मानव-बिबट्या यांचे सहजीवनावरील माहिती शिराळा मधील प्लॅनेट अर्थ फौंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील यांचा सहभाग

विकास शहाशिराळा  : कोरोनामुळे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आलेल्या आय.यु.सी.इन ग्लोबल युथ समित ( IUCNGlobal Youth Summit 2021) या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या कथावाचन उपक्रमात शिराळा मधील प्लॅनेट अर्थ फौंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील यांनी मानव-बिबट्या यांचे सहजीवनावरील माहिती सादर केली. या परिषदेत १२० देशातील बारा हजारपेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. सेंटर फॉर लार्ज लँडस्केप कंझर्वेशन या संस्थेने आयोजित केलेल्या कथा वाचन उपक्रमात होता.१३ देशातून कथांची निवड करण्यात आली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या २०१८ च्या बिबट अहवालानुसार , २०१४ च्या गणनेच्या तुलनेत देशात बिबट्यांच्या संखेत ६० % ने वाढ झाली आहे व देशात १२८५२ पेक्षा जास्त बिबटे आहेत.पूर्वी बिबट्याचे वास्तव्य जंगली भागात होते, परंतु जंगलाशेजारील बदलत्या शेतीमुळे त्यांचा वावर जंगलाबाहेर होत गेला. ऊस, मका, ज्वारी अश्या उंच व घनदाट वाढणाऱ्या पिकांचा आसरा घेत लोकवस्तीजवळ त्यांचा वावर सुरू झाला.

गावात, लोकवस्तीत असणाऱ्या मोकाट असलेले कुत्रे , डुक्कर , शेळी , मेंढी, रेडकू किंवा वासरू, मांजर अश्या आकाराने लहान प्राण्यांचा समावेश त्याच्या खाद्यात होत गेला. हे मुबलक उपलब्ध व सहज पकडता येणारे खाद्य मिळाल्याने त्याचे वास्तव्य लोकवस्तीच्या जवळ वाढू लागले. यामुळे बिबट्यांची संख्या वाढली हे नक्की . परंतु बिबट हा आपल्या गावात अढळणाऱ्या कोल्हा, लांडगा, डुक्कर, मोर, ससा यासारखाच एक वन्यजीव आहे. गावा जवळील डोंगर व शेती हा त्याचा अधिवास झाला आहे.भारतामध्ये बिबट्याला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण दिले आहे. त्यामुळे त्याला व त्याच्या अधिवासाला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहचवणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो.शिराळा मध्ये प्रादेशिक वनविभाग तसेच चांदोली वनविभाग यांच्या सोबत प्लॅनेट अर्थ फौंडेशन यांनी तालुक्यात " वन्यजीव आपत्कालीन सेवा " केली आहे . यामध्ये बिबट्या सोबत इतर सर्वच वन्यजीव , वनविभाग आणि ग्रामीण लोक यांच्या मध्ये दुवा बनून सहजीवन साधने हे ध्येय आहे . त्यामध्ये कोव्हिड चे नियम पाळत विविध जनजागृती कार्यक्रम घेतले जातात , विविध गावामध्ये लोकप्रतिनिधी सोबत सभा - चर्चासत्र घेऊन ग्रामीण भागातील निसर्ग संवर्धन व समाज विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जातात. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत जखमी वन्यजीवांचा बचाव व उपचार करणे, त्यांना सुखरूप त्यांच्या अधिवासात परत सोडणे असे प्रयत्न केले जातात. पुढे व्यवस्था तालुका आणि जिल्हा पातळीवर राबविण्याचा मानस आहे. आय.यु.सी.इन ( IUCN ) च्या कथावाचन उपक्रमात शिराळामधील मानव - बिबट सहजीवनाची ही गोष्ट उपस्थित सर्व सहभागी सदस्यांना खूप आवडली व त्यांनी खूप कौतुकही केले .या कथेसाठी प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी सुशांत काळे, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक पी.इन.पाटील, देवकी तासीलदार, बाबा गायकवाड, चांदोली वनविभागानेचे वनाधिकारी गोविंद लांगोटे, वनपाल यमगर , जे.बी.महाडिक, सांगली जिल्हा मानद वन्यजीव सदस्य अजितकुमार पाटील, संस्थेतील अनुभवी सदस्य व उपाध्यक्ष प्रणव महाजन, प्रभाषिनी मोहापात्रा यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागSangliसांगलीleopardबिबट्या