शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

कवठेएकंद परिसरात पशु वैद्यकीय सेवा कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

प्रदीप पोतदार लोकमत न्यूज नेटवर्क कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था ...

प्रदीप पोतदार

लोकमत न्यूज नेटवर्क

कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. श्रेणी-१ च्या या रुग्णालयातून परिसरात पशुवैद्यकीय सेवा वेळेत मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना खासगी रुग्णसेवेचा आधार घ्यावा लागत आहे.

कवठेएकंद येथे पशुवैद्यकीय रुग्णालयाअंतर्गत कवठेएकंद, नागाव कवठे व मतकुणकी ही गावे येतात. या तीन गावात गाई व म्हैशींची संख्या सुमारे पाच हजार २०० इतकी आहे. शेळ्या व मेंढ्या सुमारे दोन हजार आहेत. वाढलेले जनावरांचे आजार,

पशुधनाची संख्या आणि अपुऱ्या व बेभरवशाच्या वैद्यकीय सेवेमुळे पशुधन धोक्यात आले आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पशुवैद्यकीय अधिकारी दिसत नाहीत.

संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना विटा येथील रुग्णालयाचा जादा पदभार दिला आहे. तर तासगाव पशुसेवा विभागातील एका अधिकाऱ्याकडे कवठेएकंदचा अधिक भार दिला आहे. त्यांची कधीतरी येथे भेट असते. या ठिकाणी पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी व परिचारक असावेत, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.

कोट

सध्या पशुधाद्य व चारा महाग होत असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच जनावरांच्या विविध आजारांवर खासगीत उपचार करताना मोठा खर्च होत आहे. यामुळे शासकीय पशुवैद्यकीय सुविधा मिळाल्यास शेतकऱ्यांना मदत होईल.

- सर्जेराव जाधव, पशुपालक, कवठेएकंद

कोट

कवठेएकंद येथे गेल्या काही वर्षांपासून जनावरांचे आजार वाढल्याने सामान्य शेतकऱ्यांना औषध खर्च परवडत नाही. पशुपालन व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. वर्षभरात दोन जनावरे विकून टाकली.

- शिवाजी गुरव, शेतकरी, कवठेएकंद