शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींतील संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन, सात महिन्यांपासून मानधनही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 13:00 IST

परिचालकांच्या मागण्यांविषयी शासनाने लेखी व तोंडी आश्वासन देऊनही अंमलबजावणी होत नसल्याने आंदोलनाचा निर्णय

सांगली : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींतील संगणक परिचालकांनी शुक्रवारपासून (दि. १७) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. सर्व जिल्हाध्यक्षांच्या ऑनलाइन बैठकीत आंदोलनाचा निर्णय झाला. परिचालकांच्या मागण्यांविषयी शासनाने लेखी व तोंडी आश्वासन देऊनही अंमलबजावणी होत नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.परिचालकांच्या मागण्या अशा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दर्जा व किमान वेतन द्यावे, २० हजार रुपये मासिक मानधन मिळावे, टार्गेट पद्धती रद्द करावी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती द्यावी, सात महिन्यांपासूनचे प्रलंबित मानधन मिळावे.यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेला व पंचायत समितीला निवेदने देण्यात आली आहेत. दरम्यान, परिचालकांच्या आंदोलनामुळे ग्रामपंचायतींचे सर्व ऑनलाइन कामकाज थांबले आहे. एखादा परिचालक काम करताना दिसल्यास त्याच्या घरी जाऊन गांधीगिरी करण्यात येणार आहे.

१०० टक्के परिचालक आंदोलनातसंघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष रणजित पाटील यांनी सांगितले की, आंदोलनात जिल्ह्यातील १०० टक्के परिचालक सहभागी झाले आहेत. सात महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने आमची कौटुंबिक आर्थिक कोंडी झाली आहे. ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलन