शिवभोजन थाळीच्या संख्येत दीडपट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:26 IST2021-04-17T04:26:48+5:302021-04-17T04:26:48+5:30
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर आणि बाहेरगावचे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार आहे. ...

शिवभोजन थाळीच्या संख्येत दीडपट वाढ
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर आणि बाहेरगावचे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार आहे. त्यानुसार १५ एप्रिलपासून पुढील एक महिन्यासाठी शिवभोजन थाळीच्या संख्येत दीडपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, जिल्ह्यात २२ शिवभोजन केंद्र असून, त्यात ३००० हजार थाळींचे नियोजन असते. आता पुढील महिन्यासाठी ४५०० थाळी असणार आहेत.
जिल्ह्यात मार्केट यार्ड, सांगली, बसस्थानक उपाहारगृह, सिव्हिल हॉस्पिटल, आई मागासवर्गीय महिला बचत गट, विजयनगर, सांगली, बसस्थानक उपहारगृह, मिरज, स्टेशन रोड मिरज, कुपवाड, कुपवाड एमआयडीसी, तासगाव, कवठेमहांकाळ,बसस्थानक, जत, विटा - आटपाडी, हॉटेल ओमरत्न स्नॅक सेंटर, आटपाडी, एस. टी. कॅन्टिन आटपाडी, शिवगंगा हॉटेल, पलूस, शिव हॉटेल कडेगाव, आष्टा, हॉटेल पंगत, इस्लामपूर, हॉटेल बालाजी एक्झिक्युटिव्ह, इस्लामपूर, गोपालकृष्ण महिला बचत गट शिराळा यांचा समावेश आहे. या ठिकाणी शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.