शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार; वारणा, कोयना धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 17:28 IST

खरीप हंगामातील पेरण्यांनी गती घेतली

सांगली : सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. कोयना, वारणा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांनी गती घेतली आहे.जिल्ह्यात दडी मारलेल्या मान्सूनच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात चांगली हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात २८.३२ टीएमसी पाणीसाठा होता. चार दिवसांत चार टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसात ५४ मिलिमीटर तर वारण धरण क्षेत्रात २९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात सध्या १५.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत मंगळवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच होता. अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू होता.जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात दि. १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये : मिरज २.६ (६८.८), जत १.६ (५६.४), खानापूर ३ (५०.७), वाळवा ४.६ (७२), तासगाव ५ (८३.७), शिराळा १६.३ (२११.२), आटपाडी १.३ (५४.३), कवठेमहांकाळ २.१ (५४), पलूस ३.१ (५९.१), कडेगाव ३.४ (६२.८).कोकरूड बंधारा पाण्याखाली.शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. वारणा नदीची पाणीपातळी वाढून कोकरूड येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्याच्या वर एक फुटापर्यंत पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शाहुवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील लोकांना कोकरूडला येण्यासाठी तुरुकवाडीमार्गे पाच- सहा किलोमीटर दूरचा प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस