संखमध्ये वॉटर एटीएम प्लँटचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:28+5:302021-06-16T04:35:28+5:30

फोटो ओळ : संख (ता.जत) येथे वॉटर एटीएम प्लँटचे उद्घाटन आर. के. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मंगल पाटील, ...

Inauguration of Water ATM Plant in Sankh | संखमध्ये वॉटर एटीएम प्लँटचे उद्घाटन

संखमध्ये वॉटर एटीएम प्लँटचे उद्घाटन

फोटो ओळ : संख (ता.जत) येथे वॉटर एटीएम प्लँटचे उद्घाटन आर. के. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मंगल पाटील, ज्ञानेश्वर कोळी, एम. आर. जिगजेणी, सदाशिव दर्गाकर, अमर कांबळे, के. डी. नरळे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : संख (ता. जत) येथील बसवेश्वर चौकात ग्रामपंचायतीने उभारलेल्या वॉटर एटीएम प्लँटचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती आर. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आर. के. पाटील म्हणाले, ‘‘जनतेच्या हिताला ग्रामपंचायतीने प्राथमिकता दिली आहे. पाणी, वीज, रस्ते, गटारी, चौकाचे सुशोभिकरण, स्टँड परिसर असे अनेक प्रश्न गेल्या चार वर्षात सोडविण्यात यशस्वी झाले आहे. गावच्या समस्या पूर्णतः सुटल्या पाहिजेत. यासाठी प्रयत्नशील राहू.’’

सरपंच मंगल पाटील म्हणाल्या, ‘‘नागरिकांना स्वच्छ शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आमचा प्रयत्न होता. पाण्यामुळे अनेक आजार होतात. पाणी शुद्धीकरण प्रणालीचा अवलंब करणार आहे.

यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर कोळी, एम. आर. जिगजेणी, सदाशिव दर्गाकर, अमर कांबळे, ग्रामविकास अधिकारी के. डी. नरळे, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Water ATM Plant in Sankh