सुभाष देशमुख यांच्याहस्ते जतमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:20 IST2018-09-24T15:19:48+5:302018-09-24T15:20:57+5:30
जत येथे जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

सुभाष देशमुख यांच्याहस्ते जतमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन
ठळक मुद्देसुभाष देशमुख यांच्याहस्ते जतमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटनदवाखान्यासाठी 33 लाख 22 हजार रुपये खर्च
सांगली : जत येथे जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील, जत पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. ज्ञानदेव सदाकळे, डॉ. विष्णू जवणे आदि मान्यवर उपस्थित होते.
पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 33 लाख 22 हजार रुपये खर्च आला आहे.