डफळापुरात कोविड सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:42 IST2021-05-05T04:42:49+5:302021-05-05T04:42:49+5:30
डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथे श्री दत्त ग्रामीण पतसंस्थेच्या पुढाकाराने कोविड केअर सेंटर उभे करण्यात आले आहे. पालकमंत्री ...

डफळापुरात कोविड सेंटरचे उद्घाटन
डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथे श्री दत्त ग्रामीण पतसंस्थेच्या पुढाकाराने कोविड केअर सेंटर उभे करण्यात आले आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
आमदार विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे बाबासाहेब माळी यांच्या पुढाकाराने डफळापूर व पंचक्रोशीतील कोविड रुग्णांची सुव्यवस्थित सोय व्हावी या प्रमुख हेतुने डफळापुरातील मराठी मुलींची शाळा नं २ येथे ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत डफळापुरसह पंचक्रोशीत कोविड रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, यामुळे दत्त उद्योग समुहाचे सर्वेसर्वा बाबासाहेब माळी यांच्या संकल्पनेतून हे कोविड सेंटर साकारले आहे, अशी भावना पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, बाबासाहेब माळी, दिग्विजय चव्हाण, अभिजित चव्हाण, पोपटराव पुकळे, मुरलीधर शिंगे आदी उपस्थित होते.