अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालयात पांचभौतिक बाह्यरुग्ण विभागाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:04+5:302021-08-18T04:32:04+5:30
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय व पदव्युत्तर विभाग संशोधन केंद्राच्या धन्वंतरी रुग्णालयामध्ये पांचभौतिक चिकित्सा ...

अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालयात पांचभौतिक बाह्यरुग्ण विभागाचे उद्घाटन
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय व पदव्युत्तर विभाग संशोधन केंद्राच्या धन्वंतरी रुग्णालयामध्ये पांचभौतिक चिकित्सा बाह्यरुग्ण विभागाचे उद्घाटन समारंभ संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते झाले.
बृहत्रयीरत्न आयुर्वेदाचार्य वैद्यराज आत्माराम वामन दातारशास्त्री यांच्या पांचभौतिक प्रणालीनुसार आयुर्वेद पद्धतीने निदान, चिकित्सा करून रुग्णांना कमीत कमी खर्चात उपचार करणारी चिकित्सापद्धती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाली यांच्या मार्गदर्शनाखाली धन्वंतरी रुग्णालयात सुरू झाली आहे. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. संपतराव पाटील, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. विक्रम पाटील, संस्थेचे व्यवस्थापक सुनील शिनगारे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. महेश सरलया, वैद्य अनिरुद्ध कुलकर्णी, वैद्य अमृता जोशी, वैद्य नीलेश पत्की, वैद्य गौरी पत्की उपस्थित होते.
या चिकित्सा पद्धतीमध्ये शरीरातील पंचमहाभूतांचा असमतोल झाल्यामुळे होणारा रोग, त्याचे निदान उदरपरीक्षणाने केले जाते. त्यांची औषधे वैयक्तिक वैद्यांच्या देखरेखीखाली तयार होत असल्याने गुणवत्तापूर्ण असतात. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. जयवंत खरात, डॉ. अमित पेठकर, डॉ. विजयमाला चौगुले, डॉ. अलकनंदा कुलकर्णी यांनी केले. यावेळी अध्यापक, अध्यापकेत्तर कर्मचारी व हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : १७ आष्टा २
ओळ : अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालय पांचभौतिक चिकित्सा सुविधा केंद्राचे उद्घाटन संस्थापक अण्णासाहेब डांगे, प्राचार्य डॉ. अशोक वाली, कार्यकारी संचालक प्राध्यापक आर. ए. कनाई यांच्याहस्ते झाले.