वांगीत ‘आयुर केअर’ शॉपचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:24 IST2021-03-06T04:24:44+5:302021-03-06T04:24:44+5:30

वांगी : भारत हा येणाऱ्या काळात आयुर्वेदिक औषधे निर्यात करणारा जगातील एकमेव देश असेल, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य ...

Inauguration of 'Ayur Care' shop in Wangi | वांगीत ‘आयुर केअर’ शॉपचे उद्घाटन

वांगीत ‘आयुर केअर’ शॉपचे उद्घाटन

वांगी : भारत हा येणाऱ्या काळात आयुर्वेदिक औषधे निर्यात करणारा जगातील एकमेव देश असेल, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी व्यक्त केला.

वांगी (ता. कडेगाव) येथील आयुर केअर आयुर्वेदिक शॉपच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, डॉ. सचिन जिरगे, ‘सोनहिरा’चे संचालक दिलीपराव सूर्यवंशी, ‘कृष्णा’चे संचालक ब्रिजराज मोहिते, रवींद्र कांबळे, डॉ. योगेश महामुणी, डॉ. विजय होनमाने उपस्थित होते.

शरद लाड म्हणाले की, भारतात मधुमेह, उच्च रक्तदाबाचा विळका घट होत चालला आहे. यावर केमिकल उपचारामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत असते. देशात भविष्यात आयुर्वेदिक औषधाची निर्मिती मोठया प्रमाणात होणार असून भारत हा आयुर्वेदिक औषधांच्या निर्यातीचा जगात एकमेव देश असणार आहे.

यावेळी माजी सरपंच शशिकांत माळी, बाबासाहेब सूर्यवंशी, सुनील देशमुख, राहुल साळुंखे, धनाजी सूर्यवंशी आदी उपस्थित होते. अमोल मोहिते यांनी स्वागत केले. मोहन मोहिते यांनी आभार मानले.

Web Title: Inauguration of 'Ayur Care' shop in Wangi