आटपाडीत अनिल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:07+5:302021-08-18T04:32:07+5:30
ओळ : आटपाडी येथे अनिल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय पाटील यांच्या हस्ते झाले. लाेकमत न्युज नेटवर्क ...

आटपाडीत अनिल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
ओळ : आटपाडी येथे अनिल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय पाटील यांच्या हस्ते झाले.
लाेकमत न्युज नेटवर्क
दिघंची : आटपाडी तालुक्यातील युवा नेते अनिल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक आयकर आयुक्त सचिन मोटे, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, दत्तात्रय पाटील, शहाजीबापू जाधव, बंडूशेठ कातुरे, विकास कदम, विपुल कदम, धनंजय गिड्डे, तात्यासाहेब गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संजयकाका पाटील म्हणाले, आटपाडी तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एक हक्काचं ठिकाण म्हणून अनिल पाटील यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तळमळीने काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो, तर जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला निश्चितच न्याय मिळेल.
आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.