इनाम धामणीत एकावर करवतीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST2021-07-20T04:19:50+5:302021-07-20T04:19:50+5:30

सांगली : इनाम धामणी (ता. मिरज) येथे किरकोळ कारणावरून एकास करवतीने वार करून जखमी करण्यात आले. सिकंदर महमंद मुलाणी ...

Inam Dhamani stabs one with a saw | इनाम धामणीत एकावर करवतीने वार

इनाम धामणीत एकावर करवतीने वार

सांगली : इनाम धामणी (ता. मिरज) येथे किरकोळ कारणावरून एकास करवतीने वार करून जखमी करण्यात आले. सिकंदर महमंद मुलाणी असे जखमीचे नाव असून याप्रकरणी तोहीद हरुण शेख (रा. हिंदविजय काॅलनी, इनाम धामणी) याने गणेश पांडुरंग सुतार याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार दि. १७ रोजी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी तोहीद व जखमी सिकंदर हे संशयित गणेशच्या घरासमोर जाऊन त्यांनी सायकलचे राहिलेले पैसे देण्याची मागणी केली. याचा राग येऊन, तू कोण विचारणार? म्हणत संशयिताने हातातील लोखंडी करवतीने फिर्यादीचे मामा सिकंदर यांच्या मनगटावर वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर फिर्यादी तोहीदने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Inam Dhamani stabs one with a saw