शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सांगलीतील बेदाणा निघाला सोलापूरच्या बाजारात, आठवड्याला सरासरी ४५० टन आवक; सांगली बाजार समितीपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 17:57 IST

सांगलीसह कर्नाटकचा बेदाणाही सोलापूरकडे वळला

सांगली : सोलापूरबाजार समितीमध्ये बेदाण्याला चांगला दर मिळत असल्याने सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जावक सुरू आहे. सांगलीसह कर्नाटकचा बेदाणाही सोलापूरकडे वळला आहे.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी तिकडे आकर्षित झाले आहेत. प्रत्येक आठवड्याची बेदाण्याची आवक सरासरी ४५० ते ५५० टनांपर्यंत पोहोचली आहे. चांगल्या बेदाण्याला २२१ रुपये प्रतिकिलो इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. सध्याचा सरासरी भाव १६० रुपये प्रतिकिलो आहे. सांगली बाजार समितीत सरासरी १४० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीकडे वाटचाल सुरू केली आहे.सोलापुरात गेल्या आठ वर्षांपासून बेदाणा सौदे सुरू आहेत. सांगलीच्या तुलनेत सोलापुरात द्राक्ष आणि बेदाण्याचे उत्पादन खूपच कमी आहे. तरीही सौद्यामध्ये उलाढाल मात्र जोमात असते. गेल्या काही वर्षांत कर्नाटकातून बेदाणा मोठ्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीत येत आहे. विजापूर, गुलबर्गा, बागलकोट, बेळगाव जिल्ह्यांत गेल्या काही वर्षांत द्राक्षक्षेत्र वाढल्याचा फायदा सोलापूर बाजार समितीला झाला आहे. त्याच्या जोरावर सौदे वाढले आहेत. खरेदीसाठी ग्राहकांची संख्या वाढल्याने सांगलीचा बेदाणाही सोलापूरला पसंती देऊ लागला आहे.सोलापुरातील आवक दर आठवड्याला वाढत असल्याचे आडत व्यापारी शिवानंद शिंगडगाव यांनी सांगितले. विजापूर, तासगाव, सांगली, पंढरपूर व सोलापूरचे व्यापारी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. दर चांगला मिळत असल्याने हंगाम टिकून राहील, असे ते म्हणाले.सोलापूरला चारही दिशांनी जोडणारे रस्ते चांगले झाल्याचा फायदा या बाजारपेठेला मिळाला आहे. विजापुरातून सोलापूरला जाण्यासाठी सव्वा तास लागतो. तासगावला येण्यासाठी मात्र अडीच ते तीन तास लागतात. त्यामुळे सोलापूरला गेल्यास वाहतुकीचा खर्च वाढतो. त्याचा फायदा सोलापूरला मिळत आहे.

सांगली समितीपुढे आव्हान

सांगली व तासगावचा बेदाणा सोलापूरला जाऊ लागल्याने सांगली बाजार समितीला अधिक सतर्क व्हावे लागणार आहे. पारदर्शी सौदे, उधळपट्टीला लगाम, शेतकऱ्यांना वेळेत पेमेंट, दर्जेदार बेदाण्याला चांगला भाव यासाठी लक्ष द्यावे लागणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीSolapurसोलापूरMarketबाजार