शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

..अन् लोकसेवा आयोगाने भावी अधिकाऱ्यांना झिडकारले, भावी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर 

By अविनाश कोळी | Updated: March 9, 2023 18:40 IST

पुणे येथील बाणेर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखती

अशुतोष कस्तुरेकुंडल : पुणे येथील बाणेर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखती सुरू आहेत. मात्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसल्याने शेकडो उमेदवारांना झिडकारण्यात आले. यामुळे या भावी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.फेब्रुवारी २०२० मध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीत कोणत्या सालाचे नॉन क्रिमीलेअर सादर करायचे आहे याचा कोणताही उल्लेख नव्हता. नियोजनानुसार पूर्व परीक्षा सप्टेंबर २०२० मध्ये पार पडली. मुख्य परीक्षा ११ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरला झाली. तर शारीरिक चाचणी परीक्षा फेब्रुवारी २०२३ मध्ये झाली. यातून जे उमेदवार निवडले गेले त्यांची मौखिक परीक्षा सुरू आहे. यावेळी २०१९-२०२० मधील नॉन क्रिमीलेअरची मागणी केली जात आहे.

या काळात कोरोनाचा थैमान असल्याने बहुतांश शासकीय अधिकारी कार्यालयात नसल्याने उमेदवारांनी २०२०-२०२१ मधील नॉन क्रिमीलेअर काढून ठेवले होते. परंतु मौखिक परीक्षेच्या आधी कागदपत्र पडताळणी करताना संबंधित अधिकाऱ्यांनी या उमेदवारांना जाहिरातीच्या वर्षाचेच नॉन क्रिमीलेअर सादर करणे अनिवार्य असल्याचे सांगून अनेक उमेदवारांना अपात्र घोषित केले.यामुळे वर्षानुवर्षे अभ्यास केलेले आणि अगदी भरतीच्या शेवटच्या टप्प्यात असताना उमेदवारांना बाहेर काढल्याने तरुण नाराज झाले आहेत. दरम्यान आयोगाकडे काही उमेदवारांनी धाव घेतली असता तेथून अध्यादेश बदलून आणण्याचा सल्ला संबंधित अधिकाऱ्यांनी उमेदवारांना दिल्याचे समजते. शासकीय स्थरावर योग्य निर्णय होऊन दिलासा देण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे.

शासन दरबारी या उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लागेल ते सर्व प्रयत्न करून लवकरच मुख्यमंत्र्यांशी यावर तोडगा काढण्यासाठी भेटणार आहे. - अरुण लाड, आमदार  

कोणत्या वर्षातील नॉन क्रिमीलेअर हवे ते २०१९ च्या जाहिरातीत सांगितले नव्हते. पीएसआयच्या मुलाखतीलाच ही अडचण येत आहे. तरी शासनाने चालू आर्थिक वर्षातील नॉन क्रिमीलेअर स्वीकारण्याबाबत अध्यादेश काढून न्याय द्यावा. - शंकर शिंदे, रा. देऊळगावराजा, जि. बुलढाणा

टॅग्स :SangliसांगलीMPSC examएमपीएससी परीक्षाinterviewमुलाखत