शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ऊसदराचे गणित जमले, सांगलीत का बिघडले?; ऊस उत्पादकांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 16:36 IST

निर्णय न झाल्यास रविवारी चक्काजाम

समडोळी : यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये एफआरपीसह तुटलेल्या उसासाठी अपेक्षित रक्कम देण्याची निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य केला. मात्र सांगली जिल्ह्यात ऊसदराचे घोडे अडले. कोल्हापूरला जमले ते सांगली जिल्ह्यात का जमत नाही? असा संतप्त सवाल जिल्ह्यातील ऊस उत्पादकातून उपस्थित केला जात आहे.

यंदा हंगामात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे कृष्णा, वारणेच्या पाणी पातळीत घट झाली होती. हंगामानंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम लांबणीवर पडणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली. त्यातच ऊसदर, हमीभाव, एफआरपी रक्कम, तुटलेल्या उसाचा हप्ता यासाठी स्वाभिमानीने ऊसतोड बंदची हाक दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी संघटनेच्या मागणीनुसार प्रति टनास दर देण्याचे मान्य केले. ऊस उत्पादकांच्या खात्यावर तुटलेल्या उसाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू केली.सांगली जिल्ह्यात काही कारखान्यांचे अध्यक्ष, एम.डी. व शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. परंतु सर्वमान्य तोडगा निघाला नाही. सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची भूमिका कायम आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील एकही साखर कारखानदार यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर 10 डिसेंबरपर्यंत योग्य तो निर्णय न झाल्यास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राजारामबापू कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे स्वाभिमानीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हा तिढा कायम आहे. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात जमते ते सांगली जिल्ह्याला का जमत नाही? असा आक्रमक पवित्रा घेत स्वाभिमानीने ८ डिसेंबर पर्यंतचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. निर्णय न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग व अन्य ठिकाणी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा दिला आहे.

जत व डफळापुर परिसरातील कारखान्याने गतवर्षी २४५० रुपये पहिली उचल दिली होती. दोन्ही कारखान्यांनी पहिली उचल ३१०० रुपये देण्यास तयारी दर्शविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आजी- माजी मंत्र्यांनी देखील ३२०० ते ३२५० दर जाहीर केला आहे. सांगली जिल्ह्यातील कारखानदार का निर्णय घेत नाहीत. -संजय बेले, युवा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने