शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंदू राष्ट्रामध्ये प्रथम हिंदूंचे हित जपले जावे; सर्वधर्म समभावाचा जप करणार नाही - नितेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:50 IST

शहरवासीयांनी इस्लामपूर म्हणायचे बंद करत ‘ईश्वरपूर’ असेच म्हणावे

इस्लामपूर : ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदू भगिनींना फसवले जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंना मारले जात आहे. हिंदूंची संख्या कमी करण्याचे षडयंत्र आहे. अशा वेळी आम्ही सर्वधर्म समभावाचा जप करणार नाही. हिंदू राष्ट्रात पहिल्यांदा हिंदूंचे हित पाहिले जाईल, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.इस्लामपूर येथे गुरुवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने शिवाजी चौकातून हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर यल्लमा चौकात जाहीर सभा झाली. यावेळी नितेश राणे बोलत होते. भरत आदमापुरे व हर्षाताई ठाकूर यांची उपस्थिती होती.राणे म्हणाले, भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मानले जाईल. पोलिसांनी ईद, मोहरमला मुस्लिमांचे लाड पुरवू नयेत. त्यांचे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत आणि आमच्या गणेशोत्सव, नवरात्रीच्या मिरवणुका दहा वाजेपर्यंत चालतात. पोलिसांनी हिंदू बांधवांवर अन्याय करू नये. अन्यथा २४ तासांत खुर्ची ठेवणार नाही. आम्ही कायद्याचे पालन मर्यादेपर्यंत करू, त्यानंतर शस्त्रसुद्धा उचलू.भरत आदमापुरे म्हणाले, भारतात हिंदूंवर अन्याय होतो. बांगलादेशला हिंदूमुक्त राष्ट्र करायचे आहे. काँग्रेस पक्ष मुस्लीम लीगच्या मार्गावर चालला आहे.हर्षाताई ठाकूर म्हणाल्या, जिहाद्यांना फाशी द्या किंवा त्यांचा एन्काउंटर करावा. सांगली जिल्ह्यातील अनेक भगिनी लव्ह जिहादमध्ये बळी पडल्या आहेत.

लवकरच ईश्वरपूरचा अध्यादेश..शहरवासीयांनी इस्लामपूर म्हणायचे बंद करत ‘ईश्वरपूर’ असेच म्हणावे. डॉ. हेडगेवार व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘ईश्वरपूर’ असे नाव दिलेच आहे. शासन स्तरावर त्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ईश्वरपूरच्या नावाचा अध्यादेश निघेल. शहरातील बेकायदेशीर मशीद, मदरसे ठेवू नका अन्यथा हिंदूंना ते काम हातात घ्यावे लागेल, असा इशारा राणे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरNitesh Raneनीतेश राणे Hinduहिंदू