शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 3, 2015 00:13 IST

मोहनराव कदम यांच्याकडून निषेध

तासगाव : भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रविवारी करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनास तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तासगावात कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शनिवारी तासगाव बाजार समितीच्या मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते जखमीही झाले. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी रविवारी तासगाव बंदचा इशारा दिला होता. त्याला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. या बंदला तासगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रविवारी सकाळपासून सर्वच दुकाने उत्स्फूर्तपणे बंद होती. शनिवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण होते. तसेच मार्केट यार्डात रविवारी मतमोजणी होणार असल्यामुळे शहरात दोनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे शहरात तणावपूर्ण शांतता दिसून येत होती.विसापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विसापूर, हातनोली, बोरगाव, गोटेवाडी येथे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध करण्यात आला.तासगाव बाजार समिती निवडणुकीच्या मतदानावेळी हा अनुचित प्रकार घडला असून, विरोधकांना पराभव समोर दिसल्यानेच त्यांनी भाडोत्री गुंडांकडून दहशत माजविण्याचा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, नेत्यांना मारहाण केल्याने, राष्ट्रवादी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.विसापूर गाव कडकडीत बंद ठेवून राष्ट्रवादी पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांकडून निषेध फेरी काढण्यात आली. तसेच हा भ्याड हल्ला करणाऱ्या विरोधक भाजपवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. सावळज : तासगावमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीवेळी भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या घुमश्चक्रीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुकारलेल्या सावळज ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तासगावनंतर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या सावळजमधील सर्व दुकाने बंद असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. कवठेएकंद : कवठेएकंद येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाव बंद ठेवून मारहाणीचा निषेध केला. येथे जुन्या चावडीपासून राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी निषेध रॅली काढून ‘बंद’चे आवाहन केले. कुमठे, नागाव कवठे येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. (वार्ताहर)मोहनराव कदम यांच्याकडून निषेधकाँग्रेसचे नेते मोहनराव कदम यांनी रविवारी आमदार सुमनताई पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त करून, आबा कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.वायफळे येथील राष्ट्रवादीचे उमेदवार साहेबराव पाटील बाजार समिती निवडणुकीत विजयी झाल्यानंतर वायफळेमध्ये त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून व गुलाल उधळून जल्लोष केला.