आष्ट्यात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:32 IST2021-09-07T04:32:01+5:302021-09-07T04:32:01+5:30
आष्टा : आष्टा शहरातील सर्व युवक मंडळांनी एकत्र येऊन ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवावी, असे आवाहन इस्लामपूरचे उपविभागीय ...

आष्ट्यात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवा
आष्टा : आष्टा शहरातील सर्व युवक मंडळांनी एकत्र येऊन ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवावी, असे आवाहन इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी केले.
आष्टा येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. वैभव शिंदे, विशाल शिंदे,, उपनगराध्यक्ष शेरनवाब देवळे, अर्जुन माने, शिवाजी चोरमुले, पोलीस निरीक्षक अजित सिद्, सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार, संजय सनदी प्रमुख उपस्थित होते.
वैभव शिंदे म्हणाले, आष्टा शहरात कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी असली, तरी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. गर्दी टाळण्यासाठी गतवर्षीप्रमाणे गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याचा निर्धार करूया.