शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त तेल’; कर्नाटकातील पंपांवर लागले फलक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 13:36 IST

कर्नाटकात पेट्रोल सुमारे साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल साडेसात रुपयांनी स्वस्त आहे. प्रवासासाठी कर्नाटकात गेलेली वाहने तेथूनच टाकी फुल्ल करून येत आहेत.

सांगली : कर्नाटकात पेट्रोल व डिझेल स्वस्त झाल्याने महाराष्ट्राच्या सीमाभागातील पंपांचे कंबरडे मोडले आहे. १ नोव्हेंबरला घेतलेला तेलाचा साठा अजूनही संपलेला नाही. मिरज आणि जत तालुक्यातील पंपांवर विक्री पूर्णता थंडावली आहे.

३ नोव्हेंबरला केंद्र सरकारने दरकपात केल्यापासून विक्री ठप्प आहे. म्हैसाळ, सलगरे, आरग, एरंडोलीसह जत तालुक्यातील पंप ओस पडले आहेत. पंपचालकांना लाखोंचे नुकसान सोसावे लागत आहे. कर्नाटकातील उगार, कागवाड, अथणी, मंगसुळी भागात पेट्रोल १००.३३ रुपये तर, डिझेल ८४.७९ रुपये लिटर दराने मिळत आहे. सांगली जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांत पेट्रोलसाठी १०९.६९ रुपये तर डिझेलसाठी ९२.५१ रुपये मोजावे लागत आहेत. कर्नाटकात पेट्रोल सुमारे साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल साडेसात रुपयांनी स्वस्त आहे. प्रवासासाठी कर्नाटकात गेलेली वाहने तेथूनच टाकी फुल्ल करून येत आहेत. ५० लिटर डिझेलमागे सुमारे पावणेचारशे रुपयांची बचत होत आहे. सीमाभागातील रहिवासी तर दररोजच्या इंधनासाठी गावातील पंप सोडून कर्नाटकात धाव घेत आहेत.

कर्नाटकातील पंपांवर ‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त तेल’ असे फलक लागले आहेत. याचा प्रचंड मोठा फटका सीमाभागातील पंपांना बसला आहे. दररोज दहा हजार लिटर इंधनविक्री करणाऱ्या पंपांवर सध्या दिवसभरात २००-३०० लिटर इंधनही खपत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, राज्यभरातील पंपचालकांनी सरकार आणि तेल कंपन्यांकडे नुकसानभरपाई मागण्याची तयारी सुरू केली आहे. ३ नोव्हेंबरनंतर बॅंकांना दिवाळीच्या सुट्या असल्याने तेलाचा मुबलक साठा केला होता. दिवाळीनंतर पर्यटन वाढत असल्यानेही महामार्गांवरील पंपांवर ४५ ते ९० हजार लिटर तेलसाठा होता. दर अचानक कमी झाल्याने कोट्यवधींचा भुर्दंड बसला. नुकसानीचा तपशील गोळा करण्याचे काम पेट्रोल, डिझेल डिस्ट्रीब्यूटर्स फेडरेशनने सुरू केले आहे. ऑनलाईन फॉर्ममध्ये माहिती भरून घेतली जात आहे. 

राज्यातील साडेसहा हजार पंपांचे सरासरी तीन लाख याप्रमाणे सुमारे ३५० कोटींचे नुकसान झाल्याचा फेडरेशनचा दावा आहे. भविष्यात इंधन दरात कपात करताना किमान १५ दिवस अगोदर सूचना द्यावी, अशीही फेडरेशनची मागणी आहे.

जिल्ह्यात सात कोटींचा फटका

तीन नोव्हेंबर रोजी अचानक दर कमी केल्याने पंपचालकांना मोठे नुकसान सोसावे लागले. प्रत्येक पंपाची नुकसानीची सरासरी रक्कम तीन लाख रुपये आहे. सांगली जिल्ह्यातील २४० पंपांना सात कोटींचा फटका बसला.

टॅग्स :SangliसांगलीFuel Hikeइंधन दरवाढKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र