शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- गोव्याची दारू, महाराष्ट्राची बाटली; सावळजच्या हॉटेलात राजरोस विक्री, तिघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 19:15 IST

सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त

दिलीप मोहिते विटा : गोवा बनावटीची विदेशी दारू महाराष्ट्र राज्यातील विदेशी मद्याच्या बाटलीत भरून त्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या सावळज (ता.तासगाव) येथील हॉटेल फिनिक्सवर विटा उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. यावेळी गोवा बनावटीची दारू, बॉटलिंग उपकरण, बाटल्यांची बनावट झाकणे यासह सुमारे ४ लाख २४ हजार ८९५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी विनोद विठ्ठल माने (वय ३७, रा. माने वस्ती येळावी, ता.तासगाव), सुशांत अशोक गायकवाड (२७, रा. गायकवाड मळा, बस्तवडे, ता. तासगाव) व गणेश मालोजी शिंदे (२४,  रा. दहिवडी, ता.तासगाव) या तिघा संशयितांना अटक करण्यात आली.विटा उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय मनाळे यांना सावळज येथील फिनिक्स हॉटेलवर गोवा बनावटीची दारू महाराष्ट्र राज्यात विक्री होणाऱ्या बाटलीत भरून त्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विटा उत्पादन शुल्कच्या पथकाने सावळज येथील फिनिक्स हॉटेलवर छापा टाकला. यावेळी या पथकाला हॉटेलच्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये तसेच किचन भट्टीला लागून असलेल्या भूमिगत पाण्याच्या रिकाम्या टाकीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या ८९४ व मोठ्या ७५० मिलीच्या १५० बाटल्या सापडल्या.त्यावेळी पथकाने झडती घेतली असता बॉटलींग उपकरणे, बाटल्याची बनावट बुचे, गोव्याची दारू भरण्यासाठी आणलेल्या व महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या रिकाम्या ७२ बाटल्या, मोबाईल, गाळणी, प्लॉस्टिक कॅन यासह सुमारे ४ लाख २४ हजार ८९५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने विनोद माने, सुशांत गायकवाड व गणेश शिंदे या तीन संशयितांना अटक केली. विटा उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय मनाळे, प्रशांत रासकर,  सुनिल पाटील, श्रीमती माधवी गडदरे, अजय वाघमारे, दुय्यम निरीक्षक दिलीप सानप, उदय पुजारी, जवान सचिन सावंत, प्रमोद सुतार, रणधीर पाटील, अमित पाटक्षल, अर्जुन कोरवी यांनी ही कारवाई केली. निरीक्षक सुनिल पाटील पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग