बेकायदा पिस्तूल; आणखी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:29 IST2020-12-06T04:29:09+5:302020-12-06T04:29:09+5:30
बेळंकी-सलगरे रस्त्यावर सलगरे हद्दीत गुरुवारी चाैघेजण गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार आनंदा जाधव यांना मिळाली. ...

बेकायदा पिस्तूल; आणखी एकास अटक
बेळंकी-सलगरे रस्त्यावर सलगरे हद्दीत गुरुवारी चाैघेजण गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार आनंदा जाधव यांना मिळाली. पोलिसांनी शोध घेतला असता, सुखदेव हनुमंत नाईक, पपलेश पाटील (रा. आरग, ता. मिरज) प्रवीण रावसाहेब सुतार, लोकेश रावसाहेब सुतार (रा. लिंगनूर ता. मिरज) हे संशयास्पद फिरताना आढळले. पोलिसांनी चौघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुखदेव नाईक व प्रवीण सुतार पाेलिसांच्या हाती लागले, तर पपलेश पाटील व लाेकेश सुतार यांनी पलायन केले होते. यातील पपलेश पाटील यास पाेलिसांनी अटक केली असून, लोकेश सुतार फरार आहे. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे, पोलीस अंमलदार आनंदा जाधव, ज्ञानेश्वर पुणेकर, सुहास मोहिते, प्रशांत मोहिते यांनी कामगिरी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे करत आहेत.