मालगावात मुरुमाचे बेकायदा उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:37+5:302021-07-16T04:19:37+5:30

मिरज : मिरज तालुक्यातील मालगाव येथे बेकायदा मुरूम उत्खननप्रकरणी महसूल विभागाने पंचनामे केले. सुमारे ९० ब्रास मुरुमाचे उत्खनन केल्याबद्दल ...

Illegal excavation of pimples in Malgaon | मालगावात मुरुमाचे बेकायदा उत्खनन

मालगावात मुरुमाचे बेकायदा उत्खनन

मिरज : मिरज तालुक्यातील मालगाव येथे बेकायदा मुरूम उत्खननप्रकरणी महसूल विभागाने पंचनामे केले. सुमारे ९० ब्रास मुरुमाचे उत्खनन केल्याबद्दल मंडल अधिकारी अमोल हांगे, तलाठी संजय खरात व कोतवाल मामासाहेब कांबळे यांनी पंचनामा करून कारवाईसाठी मिरज तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठवला आहे.

मालगावात गणेशनगर येथे बुधवारी शेतात अवैध उत्खनन सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंडल अधिकारी व तलाठी घटनास्थळी गेले. यानंतर उत्खनन करणारा जेसीबी चालक व तीन ट्रॅक्टर चालक वाहनांसह पळून गेले. मुरुमाचे उत्खनन केलेल्या ठिकाणी पाहणी केली असता, सुमारे ९० ब्रास मुरूमाचे बेकायदा उत्खनन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याबाबत संबंधित जेसीबी व ट्रॅक्टर मालकांकडून दंडवसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याचे तलाठी खरात यांनी सांगितले.

Web Title: Illegal excavation of pimples in Malgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.