शिरढोण जिल्हा बँक शाखेत नियमांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:26 IST2021-04-16T04:26:23+5:302021-04-16T04:26:23+5:30

फोटो ओळ : हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गुरुवारी दुपारी गर्दी दिसत असूनही कोरोना नियमांचे पालन ...

Ignoring the rules in Shirdhon District Bank branch | शिरढोण जिल्हा बँक शाखेत नियमांकडे दुर्लक्ष

शिरढोण जिल्हा बँक शाखेत नियमांकडे दुर्लक्ष

फोटो ओळ : हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गुरुवारी दुपारी गर्दी दिसत असूनही कोरोना नियमांचे पालन होत नव्हते.

शिरढोण :

हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत सध्या कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. मास्कचा व सॅनिटायझरचा वापर, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन या नियमांचा फज्जा उडाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही बँकेचे कर्मचारी कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. बँकेमध्ये गुरुवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. मात्र, नियमांचे पालन होत नव्हते. कोरोना संकटाच्या काळात बँक प्रशासनाने नियमांचे पालन होईल, यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी बँकेत तशी यंत्रणा उभारली पाहिजे. तरच कोरोनाला रोखणे शक्य होणार आहे. बँक कर्मचाऱ्यांनी स्वतःबरोबर नागरिकांची देखील काळजी घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

Web Title: Ignoring the rules in Shirdhon District Bank branch