शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

बोगस खते, बियाणे विक्रेते सापडल्यास गुन्हे दाखल करा, पालकमंत्री सुरेश खाडेंचे आदेश

By अशोक डोंबाळे | Updated: May 6, 2023 17:31 IST

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर घेतली आढावा बैठक

अशोक डोंबाळेसांगली : बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करताना सापडल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार‎ खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी भरारी पथकांनी कार्यक्षमपणे काम करावे, असे आदेशही त्यांनी दिले.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या‎ अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार आदी उपस्थित होते.मंत्री खाडे म्हणाले, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतीचे उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे. दुबार पेरणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यानुसार बियाणे, खते व कीटकनाशकांची मागणी केली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेची सर्व प्रकरणे मार्गी लावून संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.

पाऊस पडेपर्यंत सिंचन योजना चालू ठेवाजलसंपदा विभागाने समाधानकारक पाऊस पडेपर्यंत जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजना सुरू ठेवावेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थकीत वीज बिलासाठी एकाही योजनेचा वीज पुरवठा खंडित करू नये, अशा सूचनाही मंत्री खाडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बोगसगिरीवर ११ भरारी पथकांची नजरबियाणे, खते आणि कीटकनाशकांची बोगस विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हास्तर भरारी पथके कार्यरत केली‎ आहेत. बोगस खते, बियाणे विक्रीबरोबर जादा दराने विक्री‎ केल्यास विक्रेत्यांवर‎ कारवाई होणार‎ आहे, असेही मंत्री खाडे म्हणाले.

खते, बियाणांचा पुरेसासाठा : विवेक कुंभारभात ६७३२ क्विंटल, ज्चारी ५६६५ क्विंटल, बाजरी २०२० क्विंटल, तूर ६२१ क्विंटल, मूग २४७ क्विंटल, उडीद ८५१ क्विंटल, भुईमूग १४६८ क्विंटल, सूर्यफूल १२९ क्विंटल, सोयाबीन १३५८६ क्विंटल, मका ६६९८ क्विंटल असे ३८ हजार १७ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. युरिया ५२१०० टन, डी.ए.पी. २०८९१ टन, एम.ओ.पी. २११७५ टन, एस.एस. पी. ३०२८६ टन आणि संयुक्त खतांचा ६४९०२ टन असे एक लाख ८९ हजार ३५४ टन रासायनिक खताची मागणी केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली