शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: रविवारी ऊस दराचा निर्णय न झाल्यास एकही कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 12:29 IST

लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही, सदाभाऊ खोत यांना टोला

सांगली : कोल्हापूरच्या फॉर्म्युल्यानुसार सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर जाहीर करुन गळीत हंगाम सुरु करावेत. या निर्णयासाठी कारखानदारांना रविवार दि. २६ रोजी पर्यंतची मुदत दिली आहे. या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर जिल्ह्यात एकाही कारखान्याचा गळीत हंगाम चालू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.राजू शेट्टी म्हणाले, मागील हंगामात गाळपास गेलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार रुपये दिले आहेत, त्या कारखान्यांनी ५० रुपये जादा द्यायचे आहेत. तसेच ज्या कारखान्याची एफआरपीच तीन हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कारखान्यांनी १०० रुपये जादा द्यायचे आहेत. तसेच चालू गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक १०० रुपये द्यायचे आहेत. या फॉर्म्युल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस दराबाबत सुरू असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडी फुटली.सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी हाच फॉर्म्युला स्वीकारावा. त्याच्यापेक्षा जास्त दिले तर हरकत नाही. कारखानदारांची रविवारी बैठक होणार आहे. त्यात निर्णय झाला तर चांगले आहे. अन्यथा जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू देणार नाही. सर्व वाहने अडविण्यात येणार असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटित आंदोलन करुन कारखानदारांना धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली मध्ये येऊ नये. मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा फॉर्म्युला तयार झाला आहे.जिल्ह्यात उसाचे मुख्य उत्पादन आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी तोडगा काढावा. घरातील पोर एकमेकांच्या उरावर बसले असताना पालकाची जबाबदारी आहे की नाही मध्यस्ती करायची, असा सवालही शेट्टी यांनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांना केला.

लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही, सदाभाऊ खोत यांना टोलागेल्या २० वर्षांपासून हा आरोप माझ्यावर होतोय. एका हाकेवर हजारो लोक रस्त्यावर उतरतात, हेच माझे सर्टिफिकेट आहे. कुण्या लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सदाभाऊ काय म्हणतोय त्यावर उत्तर द्यायला मी आलो नाही. माझे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील. माझे कार्यकर्ते त्याच्यापेक्षा मोठे असल्याचा टोला माजी खा. राजू शेट्टी यांनी लगावला.

पालकमंत्र्यांची निवड डीपीसीचा फंड वाटायला झाली काजिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांची जबाबदारी आहे. जिल्ह्याचे सध्या ऊस हेच मुख्य पीक बनले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. जिल्ह्याचे प्रश्न सुटत नसतील तर काय फक्त डीपीसीचा फंड वाटायला त्यांची निवड झाली काय, असा सवाल राजू शेट्टी यांनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे नाव न घेता उपस्थित केला.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी