शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पाणी देणार नसाल, तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या; कवठेमहांकाळचे शेतकरी आक्रमक

By संतोष भिसे | Updated: April 19, 2024 18:13 IST

अग्रणी नदी बारमाही झाल्यास गावे दुष्काळमुक्त होतील

महेश देसाईकवठेमहांकाळ : पाणी देणार नसाल, तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. म्हैसाळ व टेंभू सिंचन योजनेचे पाणी अग्रणी नदीत सोडावे यासाठी ते आक्रमक झाले आहेत. सिंचन योजनांचे कालवे सध्या तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्याची जीवन वाहिनी असलेली अग्रणी नदी मात्र कोरडीठाक पडली आहे. घाटमाथ्यावर टेंभू सिंचन योजना वाहत असून गावे कोरडी पडली आहेत. योजना असूनही गावांना फायदा नाही, त्यामुळे अग्रणीकाठचे तहानलेले शेतकरी अग्रणी नदीत आंदोलन करताना दिसत आहेत.अग्रणी नदी खोऱ्यात मळणगाव, शिरढोण, मोरगाव, विठुरायाचीवाडी, हिंगणगाव, अग्रण धुळगाव, लोणारवाडी अशी गावे आहेत. अग्रणी नदी बारमाही झाल्यास गावे दुष्काळमुक्त होतील. त्याचबरोबर हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येईल. फळशेती, फुलशेतीबरोबर भाजीपाल्याचा शेती व्यवसाय हायटेक बनवत आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. पण पाणी सोडण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तेथील शेतकरी करताना दिसत आहेत.

पाटबंधारे विभागाला अग्रणी नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली; परंतु ते दुर्लक्ष करत आहेत. काही दिवसांत पाणी अग्रणीला नाही सोडले, तर आंदोलन करणार आहोत. -प्रिया सावळे, सरपंच, हिंगणगाव 

म्हैसाळ योजनेच्या पाण्याने धुळगावमधील बंधारे भरून मिळावेत यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले. पण दखल न घेतल्यामुळे आम्ही सर्व सदस्य व ग्रामस्थांना अग्रणी नदीमध्ये उपोषण करावे लागले. पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये. - शिवदास भोसले, सरपंच, अग्रण धूळगाव

लोणारवाडी गावाने दुष्काळाच्या झळा खूप सोसल्या आहेत. शासनाने अग्रणी नदीला पाणी सोडावे, अन्यथा आम्हाला कर्नाटक राज्यात सामील होण्यासाठी परवानगी द्यावी. -अजित खोत, सरपंच, लोणारवाडी

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरीKarnatakकर्नाटक