इचलकरंजीत महाराष्ट्र आणि कामागार दिन उत्साहात साजरा
By Admin | Updated: May 3, 2014 14:27 IST2014-05-03T13:23:36+5:302014-05-03T14:27:00+5:30
येथील नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयजीएम रुग्णालयाच्या आवारात नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

इचलकरंजीत महाराष्ट्र आणि कामागार दिन उत्साहात साजरा
येथील नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयजीएम रुग्णालयाच्या आवारात नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गीत व देशभक्तिपर गीतांचे गायन करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या कर्मचार्यांच्यावतीने नाट्यगृहामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी सुनील पवार, प्रज्ञा पोतदार, श्रीराम गोडबोले, विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, नगरसेवक शशांक बावचकर, सुनीता मोरबाळे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो ओळी)
नगरपालिकेच्यावतीने येथील आयजीएम रुग्णालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर व अन्य नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.