शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जनतेच्या प्रेमासाठी चोवीस तास सेवक म्हणून उभा राहीन, रोहित पाटील यांनी दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 18:13 IST

मळणगावात ‘कर्तव्य यात्रे’चा सांगता समारंभ

कवठेमहांकाळ : विधानसभा मतदारसंघांमध्ये जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ‘कर्तव्य यात्रा’ काढली. या कर्तव्य यात्रेमध्ये मी गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलो. शिवाय वाड्या-वस्त्यांनाही भेटी दिल्या. कर्तव्य यात्रेत कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने माझ्यावर प्रेम केले आणि या प्रेमाची उतराई म्हणून जनतेसाठी चोवीस तास सेवक म्हणून उभा राहीन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांनी दिली.रोहित पाटील यांच्या कर्तव्य यात्रेचा सांगता समारंभ मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे पार पडला. यावेळी रोहित पाटील बोलत होते. सांगता समारंभाच्या अगोदर रोहित पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी शिरढोण ते मळणगाव, अशी हजारो कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढली. या पदयात्रेचेही मळणगाव सभेत रूपांतर केले.रोहित पाटील म्हणाले, आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती व तरुणांच्या हाताला काम तसेच शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हेच या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक आबांनी व सुमनताई पाटील यांनी केली आहेच; परंतु उर्वरित प्रश्न सोडवण्याची माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीतून मी तसूभरही मागे सरकणार नाही.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील म्हणाले, आमच्या विरोधकांनी आम्ही विश्वासघात केला, असे सांगत सुटले आहेत. मात्र, कवठेमहांकाळ, नगरपंचायत, तासगाव पंचायत समितीमध्ये कोणी गद्दारी केली, हे सर्वांना माहीत आहे. तरीही आमच्या विरुद्ध आरोप केले जातात. माझ्या पुतण्याविरोधात विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची भाषा होते. खरंतर लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु शिकार करण्याची भाषा ही सामान्य माणसाला न पटणारी आहे. रोहितविरोधात निवडणुकीच्या मैदानात याच जनता आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर तुम्हाला अस्मान दाखवू, असा इशारा त्यांनी दिला.बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोहित पाटील यांनी पुढाकार घ्यावा. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्वासन युवा नेते शंतनू सगरे यांनी दिले.दिग्विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले व अजित शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला आमदार सुमनताई पाटील, अनिता सगरे, विकास हकके, दादासाहेब कोळेकर, सुरेखा कोळेकर, कुमार पाटील, चंद्रशेखर सगरे, अमित कोळेकर, मळणगावच्या सरपंच सुरेखा जाधव, साधना कांबळे, मीनाक्षी माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीRohit Patilरोहित पाटिलPoliticsराजकारण