शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एका फोनवर माझाही पहाटेचा शपथविधी होईल - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 12:34 IST

देशाचे कर्ज बुडविणाऱ्या उद्योगपतींचे २५ लाख कोटींची कर्ज माफ केले जाते, पण आमच्या शेतकऱ्याचे व्याजही माफ होत नाही.

बोरगाव : एका फोनवर माझाही पहाटेचा शपथविधी होईल; पण मी शरद पवार यांचा विश्वासघात करणार नाही. देशात भ्रष्टाचाराचा नवा फंडा आला आहे. उद्योगपतींकडून बाँडच्या व देणगीच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांचा निधी पक्षाला देणगीच्या स्वरूपात जमा केला जातोय. हा भ्रष्टाचार नाही का..? असा प्रश्न आमदार जयंत पाटील यांनी भाजपचे नाव न घेता उपस्थित केला.बोरगाव (ता.वाळवा) येथे विकासकामांचे उद्घाटन, बिरोबा सोसायटीचा शताब्दी समारंभ व बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे अध्यक्षस्थानी होते.पाटील म्हणाले, देशातील चार-पाच उद्योगपतींची कोटीची संपत्ती हजारो कोटींच्या घरात कशी गेली, त्यांची चौकशी कोण करणार..? देशाचे कर्ज बुडविणाऱ्या उद्योगपतींचे २५ लाख कोटींची कर्ज माफ केले जाते, पण आमच्या शेतकऱ्याचे व्याजही माफ होत नाही. याउलट शेतकऱ्यांच्या खतांवर जीएसटी लावला जातो. ही बाब लाजिरवाणी आहे. या सरकारने गृहिणींच्या वस्तूंवरही जीएसटी लादला आहे. स्वातंत्र्यानंतर देशावर ५६ कोटींचे कर्ज होते. आज ते २०५ लाख कोटी झाले आहे. अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते, तर किती फरक पडला असता, कर्जमाफी फक्त शरद पवार हेच करू शकतात.यावेळी श्यामराव वाटेगावकर, धैर्यशील पाटील, शोभा शिंदे, माणिकराव पाटील, अभिजीत पाटील, कार्तिक पाटील, उदयसिंह शिंदे, देवराज देशमुख, सचिन पाटील, शिवाजी वाटेगावकर, विलास शिंदे, विजय वाटेगावकर, रणजीत शिंदे, हिंदुराव वाटेगावकर उपस्थित हाेते.

रिकाम्या टाक्या स्वयंपाकास बसायला..काँग्रेसच्या काळात ४५० रुपयांना मिळणारा गॅस भाजपने धुरापासून मुक्तीची जाहिरात करून झोपडीत पोहोचवला आणि त्याची किंमत १,२०० केली. यामुळे पुन्हा गॅस भरून घेण्याऐवजी महिला रिकाम्या टाकीचा वापर जेवण बनविण्यासाठी बसायला करू लागल्या आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलministerमंत्रीBJPभाजपा