कितीही बांडगुळं आली तरी मी घाबरत नाही; आ. अनिल बाबरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 01:32 PM2023-03-05T13:32:54+5:302023-03-05T13:34:01+5:30

आ. बाबर यांनी शनिवारी खानापूर तालुक्यातील वाझर येथील एका कार्यक्रमात खासदार राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.

I am not afraid of any trouble; MLA Anil Babar attacks Sanjay Raut | कितीही बांडगुळं आली तरी मी घाबरत नाही; आ. अनिल बाबरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

कितीही बांडगुळं आली तरी मी घाबरत नाही; आ. अनिल बाबरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

googlenewsNext

दिलीप मोहिते 

विटा (जि. सांगली) - काल-परवा विट्यात एक वेड आलं अन् पुढील आमदार शिवसेनेचाच..असे म्हणत माझाच प्रचार करून गेलं, असा टोला लगावत खानापूर मतदारसंघात कितीही बदल झाला आणि कितीही बांडगूळ आली तरी मी घाबरत नाही, असा हल्लाबोल आ. अनिल बाबर यांनी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्यावर केला.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत गेल्या दोन दिवसापूर्वी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विटा येथे आल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांच्यावर कडाडून हल्ला चढवला होता. त्यावेळी त्यांनी मी जातो तिथे बाबरी हमखास पडते.. असे म्हणत आमदार बाबर यांना डिवचले होते.

त्या पार्श्वभूमीवर आ. बाबर यांनी शनिवारी खानापूर तालुक्यातील वाझर येथील एका कार्यक्रमात खासदार राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. खासदार राऊत यांना उद्देशून आ. बाबर म्हणाले, तुम्ही सारखे आम्हाला गद्दार म्हणता. पण आम्ही गद्दारी केली असती तर शिवसेना पक्ष, त्याचे नाव व चिन्ह आम्हाला मिळाले असते का? असा सवाल केला. आम्ही ५० खोके घेतले म्हणताय तर तुमची व माझी पण ईडी चौकशी लावू या. इडीला मी पण पत्र देतो, तुम्ही पण पत्र द्या. कळुदे एकदा लोकांना सत्य काय ते. असा पलटवार खा. संजय राऊत यांच्यावर करीत तुम्ही कितीही पळापळी केलीत तरी आता युतीचेच सरकार येईल, असा टोला आ. अनिल बाबर यांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीला लगावला.

Web Title: I am not afraid of any trouble; MLA Anil Babar attacks Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.