शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील हुतात्मा, राजारामबापू, कृष्णा कारखान्यास साडेचार कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 18:01 IST

हरित लवादाच्या खंडपीठाकडे प्रतिज्ञापत्र सादर : कृष्णा नदीतील प्रदूषणास जबाबदार

सांगली : राजारामबापू, हुतात्मा, कृष्णा हे कारखाने आणि त्यांच्या डिस्टिलरींना एकूण चार कोटी ४६ लाख ४० हजार रुपये पर्यावरणीय नुकसान भरपाई (प्रदूषण दंड) आकारली आहे. या दंडाचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवताडे यांनी दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय हरित लवादाच्या खंडपीठाकडे सादर केले आहे. याचिकेवरील अंतिम सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी आहे, अशी माहिती याचिकाकर्ते स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, ॲड. ओमकार वांगीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.फराटे व ॲड. वांगीकर म्हणाले, कारखान्यांच्या प्रदूषणामुळे कृष्णा नदीत जुलै २०२२ मध्ये मृत मासे आढळून आले होते. नदीच्या प्रदूषणप्रकरणी पुणे येथील हरित लवादाकडे याचिका दाखल होती. यावर न्यायालयाने २४ ऑगस्ट २०२२ रोजी तज्ञ समिती नेमून समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार समितीने १५ नोव्हेंबर २०२२ रोजी हरित न्यायालयात अहवाल सादर केला. सदर अहवालात महापालिकेचा शेरीनाला व सांगलीवाडी येथील नाला, आष्टा व इस्लामपूर नगरपालिका, नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना दोन युनिट, राजारामबापू साखर कारखाना व डिस्टिलरी, यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना व डिस्टिलरी युनिट यांनी पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. संबंधितांवर पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारावी अशी मागणी हरित लवादाकडे केली. त्यानुसार हरित लवादाने मासे मृत्यूप्रकरणी जबाबदार संस्थांवर पर्यावरणीय नुकसान भरपाईची रक्कम आकारणी करा व केलेल्या आकारणीचे प्रतिज्ञापत्र लवादाकडे सादर करा, असे आदेश हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते. 

त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण नुकसान भरपाईची आकारणी करून प्रतिज्ञापत्र लवादाकडे सादर केले. हुतात्मा कारखाना युनिटला ४२ लाख ३० हजार, हुतात्मा डिस्टिलरी ५६ लाख ७० हजार, राजारामबापू कारखाना ४० लाख ५० हजार, राजारामबापू डिस्टिलरी ७४ लाख १० हजार, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना एक कोटी १६ लाख ४० हजार, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना डिस्टिलरी युनिट एक कोटी १६ हजार ४० हजार रुपये इतकी रक्कम पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून आकारणी केली आहे, अशी माहिती ॲड. वांगीकर यांनी दिली.

महापालिकेला होणार मोठा दंडशेरीनाला व अन्य नैसर्गिक नाल्यातून सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. अनेक वर्षांपासून नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दंडाची आकारणी निश्चित करण्यासाठी त्यांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. दंडाची रक्कम मोठी असून ती ५० ते १०० कोटींपर्यंत असण्याची शक्यता आहे, असे ॲड. वांगीकर म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेpollutionप्रदूषण