शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: मुलगी झाली, घरी आली तर मी फास लावून घेईन; पतीने पत्नीला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:21 IST

सासरच्या तिघांविरुद्ध विट्यात गुन्हा 

विटा : मुलगी झाली, पण तू घरी आली तर मी फास लावून घेईन व तुम्हा सर्वांना कायद्याच्या कचाट्यात अडकवीन, अशी धमकी देत वडिलाकडून २० तोळे सोने घेऊन ये, असे सांगून विवाहिता कोमल विशाल सावंत (वय २८, रा. मसुचीवाडी, ता. वाळवा, सध्या रा. कार्वे, ता. खानापूर) हिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती विशाल धोंडीराम सावंत, सासू संगीता धोंडीराम सावंत व दीर वैभव धोंडीराम सावंत (सर्व रा. मसुचीवाडी, ता. वाळवा) या तिघांविरुद्ध विटा पोलिसांत दि. ७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.कार्वे येथील कोमल हिचा विवाह मसुचीवाडी येथील विशाल सावंत याच्याशी झाला होता. विवाहानंतर दि. ३ मे २०२३ ते २ मे २०२४ या कालावधीत विवाहिता कोमल हिचा सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. संशयित पती, सासू व दीर यांनी संगनमताने घराचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी कोमल हिला माहेरहून पैसे आणण्यास सांगितले.

त्यास तिने नकार दिल्यानंतर तिच्या परस्पर तिचे सोन्याचे दागिने बॅँकेत गहाण ठेवले. ते त्यांनी परत आणून दिले नाहीत. विवाहिता कोमल हिने माझे सोन्याचे दागिने बॅँकेतून परत आणा, असे सांगिल्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन वडिलांकडून २० तोळे सोने आण आणि ते त्यांच्याकडून घेतल्याशिवाय नांदायला येऊ नको, अशी धमकी दिली. त्यादरम्यान कोमल हिला मुलगी झाली. ही बातमी मसुचीवाडीतील सासरच्या मंडळींना दिल्यानंतर पती विशाल सावंत याने तुला मुलगी झाली आहे, तू माझ्या घरी आलीस तर मी फास लावून घेईन व तुम्हा सर्वांना कायद्याच्या कचाट्यात अडकवीन, अशी पुन्हा धमकी देऊन तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी विवाहिता कोमल सावंत हिने सोमवारी विटा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पती विशाल सावंत, सासू संगीता सावंत व दीर वैभव सावंत या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४९८ (अ), ५०४, ५०६, व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस