शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: बांधकाम कामगाराकडे का बघतेस, संतप्त पतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:05 IST

विटा पोलिसांत गुन्हा दाखल

विटा : घरासमोर सुरू असलेल्या घर बांधकामावरील कामगाराकडे का बघतेस, असा जाब विचारून संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना गावठाण भेंडवडे (ता. खानापूर) येथील शेतात घडली. भारती विठ्ठल जानकर (वय ३१, रा. गावठाण भेंडवडे) जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित पती विठ्ठल अरुण जानकर याच्याविरुद्ध बुधवारी दुपारी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.गावठाण भेंडवडे येथील विठ्ठल जानकर याच्या घरासमोर इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर कामगार काम करीत आहेत. या कामगाराकडे पत्नी भारती ही नेहमी जाता-येता बघत होती, असा संशय पतीला होता. मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता विठ्ठल हा पत्नी भारती हिला घेऊन वरचे माळ नावाच्या शेतात गेला.त्याठिकाणी गेल्यानंतर पत्नी भारती हिला ‘तू नेहमी बांधकामावर असलेल्या कामगाराकडे का बघतेस’ असा जाब विचारला. त्यावेळी दोघांत वाद सुरू झाला. या वादाच्या रागातून पती विठ्ठल याने वैरण काढण्यास आणलेल्या कोयत्याने पत्नी भारती हिच्यावर हल्ला चढविला.या हल्ल्यात भारती हिच्या उजव्या हाताच्या कोपरावर वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर खाजगी रुग्णायलयात उपचार करण्यात आले. बुधवारी दुपारी विटा पोलिसांत येऊन पत्नी भारती हिने पती विठ्ठल जानकर याच्याविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार आनंदराव पाटील करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस