सांगली, हरिपूरमध्ये रक्तदानाला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:46+5:302021-07-05T04:17:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकमत रक्तदान महायज्ञ उपक्रमाअंतर्गत हरिपूर (ता. मिरज ) येथे रविवारी शिबिर झाले. जायंट्स ग्रुप, ...

सांगली, हरिपूरमध्ये रक्तदानाला उदंड प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लोकमत रक्तदान महायज्ञ उपक्रमाअंतर्गत हरिपूर (ता. मिरज ) येथे रविवारी शिबिर झाले. जायंट्स ग्रुप, प्रेरणा सहेली, प्राथमिक आरोग्य केंद्र, कृष्णामाता मंडळाने आयोजन केले.
यावेळी ‘लोकमत’चे शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे व जायंट्स ग्रुप प्रेरणा सहेलीच्या सुनीता शेरीकर, अमृता खोत, हरमितकौर पाटील, सुचेता हरळीकर, अश्विनी सुमंत, अनघा कुलकर्णी, शोभा चव्हाण, अमृता परीट, सीमा मगदूम, आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये आदित्य कुलकर्णी, सुमित हराेलीकर, अश्विनी गुरव, सचिन कदम, गीतांजली बिराजदार, प्रणव हनुगरे, रोहित जाधव, हर्षल बाेंद्रे, प्रज्ज्वल माेरे, सुजित मगदूम, प्रकाश सामंत, ओंकार शेरीकर, अमृता परीट, सीमा मगदूम, सचिन पाटील, रणजित मगदूम, सरस्वती निकम, बाबूराव चव्हाण, रेखा चव्हाण, पूजा चव्हाण, प्रकाश चव्हाण, अजित मगदूम, आनंद चव्हाण, पूजा माळी, शाेभा कदम, प्रणाली पाठक, लक्ष्मीकांत मालाणी यांनी रक्तदान केले.
‘लोकमत’ व ‘आयएमए’तर्फे आयएमए हॉलमध्ये शिबिर झाले. ‘आयएमए’च्या अध्यक्षा डॉ. माधवी पटवर्धन, सचिव डॉ. सुहास जोशी यावेळी उपस्थित होते. शिबिरामध्ये अरविंद काटकर, अजय नाेली (पवार), माेहन लांडगे, संदीप रॉय, मारिया बसरव, सय्यान मुखर्जी, अरिंदम घाेष, सानिया रुकैय्या, प्रतीककुमार पांडे, अनिकेत लिमये, लक्ष्मण मुंडे, संताेष वैद्य, गजानन डाेंबाळे, मंदार कचरे, विनायक परीट, दीपक पाटील, प्रणिल माने, संजय निटवे, डाॅ. उमेशचंद्र लाहोटी, डाॅ. साैरभ पटवर्धन, डाॅ. विद्यासागर चाैगुले, अभयकुमार जाधव, साैरभ मराठे, सुभाष देसाई, शुभम माळी, धीरज पाटील, राेहन गाेईलकर यांनी रक्तदान केले.
चौकट
आजचे शिबिर
आज, सोमवारी सांगली -मिरज रस्त्यावर भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिबिर होणार आहे. सकाळी दहापासून रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये शिबिर सुरू होईल.