शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

इस्लामपूर-शिराळ्यात महायुतीच्या उमेदवारीसाठी नेत्यांचा कस, जयंत पाटील यांना आव्हान देण्याची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:25 IST

महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा

अशोक पाटीलइस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. विशेषत: दक्षिण महाराष्ट्रातील इस्लामपूर, शिराळा, तासगाव या मतदारसंघांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राहणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार शोधण्यासाठी कस लागणार आहे.

राज्यातील महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील उमेदवार निवडीसाठी चाचपणी सुरू केली आहे. दक्षिण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत, त्या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाव्यात, असा सूर राष्ट्रवादीतून आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर-शिराळा मतदारसंघावर जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. तासगाव मतदारसंघात दिवंगत नेते आर. आर. पाटील गटाचा वरचष्मा आहे. येथे त्यांचे पुत्र रोहित पाटील यांनी लढण्यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे या तीनही मतदारसंघांत उमेदवार शाेधण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावाइस्लामपूर-शिराळा मतदारसंघात अजित पवार गटाने चाचपणी सुरू केली आहे. तालुकाध्यक्ष केदार पाटील यांनी राष्ट्रवादीची बांधणी जोमाने सुरू केली आहे. दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याविरोधात भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुकांनी विधानसभेसाठी जाेरदार तयारी चालविली आहे. यामुळे महायुतीचा उमेदवार निवडताना नेत्यांचा कस लागणार आहे.

मानसिंगराव नाईक यांच्या निधीवरून चर्चाराज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात केवळ आमदार मानसिंगराव नाईक यांनाच निधी मिळाला. त्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनीच हा निधी दिला. त्यामुळे भविष्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतूनच ते उमेदवारी घेतील, अशा राजकीय चर्चेला शिराळ्यात उधाण आले आहे; परंतु मानसिंगराव नाईक हे आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत ठाम असल्याचे सांगतात.

राज्यात जिथे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत, अशा सर्व जागा अजित पवार गटाला मिळाव्यात; परंतु काही ठिकाणी महायुतीकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करण्याचा विचार व्हावा. मतदारसंघातील अंदाजित चाचपणीनुसार ज्या पक्षाला पसंती मिळेल, त्याला उमेदवारी देण्यात यावी. - वैभव पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार