कुपवाडच्या सिद्धार्थनगरमध्ये घराला शॉर्टसर्किटने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:15+5:302021-01-19T04:29:15+5:30

कुपवाड : शहरातील सिद्धार्थनगर भागात राहणाऱ्या सुधाकर चुडाप्पा कांबळे यांच्या राहत्या घराला सोमवारी रात्री आठच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग ...

A house in Siddharthnagar of Kupwad caught fire due to short circuit | कुपवाडच्या सिद्धार्थनगरमध्ये घराला शॉर्टसर्किटने आग

कुपवाडच्या सिद्धार्थनगरमध्ये घराला शॉर्टसर्किटने आग

कुपवाड : शहरातील सिद्धार्थनगर भागात राहणाऱ्या सुधाकर चुडाप्पा कांबळे यांच्या राहत्या घराला सोमवारी रात्री आठच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. या घटनेची रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

सिद्धार्थनगरमध्ये सुधाकर कांबळे यांचे बांधीव घर आहे. या घरात ते पत्नी व एका मुलासोबत राहतात. त्याच्या घराला सोमवारी रात्री आठच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली. यावेळी घरातून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने घटनास्थळी कांबळे व त्यांच्या नातेवाइकांची पळापळ सुरू झाली.

यावेळी शेजारील नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. जवानांनी अथक प्रयत्न करून तासाभरात आग आटोक्यात आणली. तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य, मिक्सर, कपडे जळून खाक झाले होते. कौले फुटून अन्य साहित्याचेही नुकसान झाले. घटनास्थळी माजी आमदार प्रा. शरद पाटील, नगरसेवक प्रकाश ढंग यांनी भेट देऊन नुकसानग्रस्तांची विचारपूस केली.

Web Title: A house in Siddharthnagar of Kupwad caught fire due to short circuit