शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत घरफोडी करणारा चोरटा जेरबंद, अडीच लाखाचे दागिने जप्त

By शीतल पाटील | Updated: September 19, 2022 18:04 IST

अटक केलेला चोरटा रेकॉर्डवरील गुन्हेगार

सांगली : मिरजेतील मिशन हॉस्पीटल चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून घरफोडीतील चोरट्याला जेरबंद केले. संदीप यशवंत पाटील (वय २५, रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) असे संशयिताचे नाव आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी अडीच लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात घरफोडीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणातील चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस अधिक्षक दीक्षीत गेडाम यांनी दिले होते. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या नेतृत्वाखाली खास पथक नियुक्त केले. या पथकातील हवालदार सागर लवटे यांना तासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीत संदीप पाटील हा संशयित असून तो मिरजेतील मिशन हॉस्पीटल चौकात दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे एस सोन्याचे गंठण, मंगळसुत्र, कानातील टॉप्स, सोन्याचे पेंडण, चांदीचे पैजन,, जोडवी असा २ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या दागिनेबाबत तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. पोलिसांनी अधिक चौकशी करता त्याने तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी व आळते या दोन गावात घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली.

पाटील रेकॉर्डवरील गुन्हेगारसंदीप पाटील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात बारामती शहर पोलिसांत तीन गुन्हे दाखल आहेत. या गु्न्ह्यात तो फरार आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस