पलूसला व्याजाच्या रकमेपोटी घर, जमीन हडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST2020-12-12T04:43:05+5:302020-12-12T04:43:05+5:30

संगीता गायकवाड या पलूस येथे खानावळ चालवितात. २०१७ मध्ये फिर्यादीच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज होती. म्हणून चंद्रकांत जाधव आणि ...

The house and land were seized by Palus for interest | पलूसला व्याजाच्या रकमेपोटी घर, जमीन हडप

पलूसला व्याजाच्या रकमेपोटी घर, जमीन हडप

संगीता गायकवाड या पलूस येथे खानावळ चालवितात. २०१७ मध्ये फिर्यादीच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज होती. म्हणून चंद्रकांत जाधव आणि जगदीश भगत यांच्याकडून त्यांनी सहा लाख रुपये १५ टक्के व्याजाने घेतले होते. यासाठी तारण म्हणून पतीच्या नावे असलेले पलूस हद्दीतील गट नंबर २४३३ मधील १३.२५ गुंठे जमीन क्षेत्र दिले होते. त्यानंतर संशयित आरोपींनी गायकवाड यांच्या पतीला धमकावून तारण क्षेत्राचा दस्त करून घेऊन, मुद्दल सहा लाखाची व व्याज नऊ लाख असे एकूण १५ लाख रुपये वसूल केले. दस्त उलटवून न देता त्यातील चार गुंठे जमीन व्याजापोटी हडप करूनही वेळोवेळी आरोपी हे गायकवाड यांच्या घरीत येऊन राहतात व ‘हे घर माझे आहे, घर खाली करा’, असे धमकावत असल्याचे संगीता गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव करीत आहेत.

Web Title: The house and land were seized by Palus for interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.