शिवरायांच्या पुतळ्याबाबत तासगावात नगराध्यक्ष दालनाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:02 IST2018-06-06T14:02:14+5:302018-06-06T14:02:14+5:30

तासगावात वारंवार मागणी करूनही शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, नगरपालिका पुतळ्याबाबत राजकारण करत आहे, असा आरोप करीत तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली. खुर्च्या फेकून देत काचा फोडल्या.

In the hours of Shivaji's statue, | शिवरायांच्या पुतळ्याबाबत तासगावात नगराध्यक्ष दालनाची तोडफोड

शिवरायांच्या पुतळ्याबाबत तासगावात नगराध्यक्ष दालनाची तोडफोड

ठळक मुद्देपुतळा न बसवल्यास पालिका पेटवून देण्याचा इशाराराष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बघ्याची भूमिकाखुर्च्या फेकून देत काचा फोडल्या

सांगली : तासगावात वारंवार मागणी करूनही शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, नगरपालिका पुतळ्याबाबत राजकारण करत आहे, असा आरोप करीत तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली. खुर्च्या फेकून देत काचा फोडल्या.

यावेळी 30 जुलैपर्यंत पुतळा न बसवल्यास पालिका पेटवून देण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. नगराध्यक्षांचे दालन फोडत असताना भाजप नगरसेवकांनी नगराध्यक्षांना एकट्याला सोडून पळ काढला, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बघ्याची भूमिका घेतली.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून शिवसैनिक या आंदोलनाबाबत पोलिसांना निवेदन देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी निवेदन स्वीकारले नाही.

Web Title: In the hours of Shivaji's statue,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.