शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत बालिका दगावल्याने रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांना मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:20 IST

हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

मिरज : मिरजेत रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी बालरुग्णालयाची तोडफोड करीत ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश आमणापुरे यांना मारहाण केली. या तोडफोडीत वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे लाखोंचे नुकसान झाले. याबाबत गांधी चौक पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा मिरज ‘आयएमए’कडून निषेध केला आहे.मिरजेत गुरुवारी रात्री ११ वाजता बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश अमणापुरे यांच्या अल्फा हॉटेलजवळील स्वप्निल बाल रुग्णालयात मुस्तफा शेख (रा. शामरावनगर, सांगली) यांच्या १३ महिन्यांच्या अत्यवस्थ लहान मुलीला उपचारासाठी आणले होते. मात्र उपचारापूर्वीच बालिकेचा मृत्यू झाला. यामुळे डॉक्टर उपचारासाठी लवकर आले नसल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मुस्तफा शेख व त्यांच्यासोबत असलेल्या सहा नातेवाईकांनी रुग्णालयातील फर्निचर व वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली.

डॉ. प्रकाश अमणापुरे यांना मारहाण व शिवीगाळ केली. यामुळे रुग्णालयांतील वैद्यकीय साहित्य व मालमत्तेचे लाखोचे नुकसान झाले. तोडफोड व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. रुग्णालयात आणलेल्या रुग्ण बालिकेची तपासणी व उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तरीही नातेवाईकांनी तोडफोड व मारहाण केल्याचे डॉ. प्रकाश अमणापुरे यांनी सांगितले. या घटनेचा निषेध करून मिरज आयएमएच्या सदस्यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केली.याबाबत पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात मुस्तफा शेख व अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोरांवर कारवाईची मागणीमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा, व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्थांमध्ये हिंसक कृत्य, मालमत्तेची हानी व नुकसानीस प्रतिबंध अधिनियमानुसार हल्लेखोरांवर कारवाईची मागणी मिरज आयएमएचे अध्यक्ष डॉ. रविकांत पाटील यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस