कृष्णा व्हॅली रोटरीतर्फे डॉक्टर्स, सीएंचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:58+5:302021-07-07T04:31:58+5:30
कृष्णा व्हॅली रोटरी क्लबतर्फे डॉक्टर्स व सीएंचा सत्कार झाला. यावेळी जयजीत परितकर, वीरेंद्र पाटील, राजन राजोपाध्ये, राजेंद्र मेढेकर आदी ...

कृष्णा व्हॅली रोटरीतर्फे डॉक्टर्स, सीएंचा सन्मान
कृष्णा व्हॅली रोटरी क्लबतर्फे डॉक्टर्स व सीएंचा सत्कार झाला. यावेळी जयजीत परितकर, वीरेंद्र पाटील, राजन राजोपाध्ये, राजेंद्र मेढेकर आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीतर्फे डॉक्टर्स व चार्टर्ड अकाउंटंट्स यांचा गौरव करण्यात आला. आरोग्य यंत्रणेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स व काही चार्टर्ड अकाउंटंटसना सन्मानपत्र व रोप देण्यात आले.
डॉक्टर डे व सीए डे याचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला. डॉ. योगेश साळुंखे, डॉ. अनिल जुमराणी, डॉ. मनोज पाटील, डॉ. अंजली धुमाळ, डॉ. रेखा खरात, डॉ. निखिल पाटील, डॉ. चेतन शिखरे, सीए रणजित शिंदे, विजय ठक्कर, रमेश जोशी, मकरंद कुलकर्णी, यश साबणे, अजिंक्य कुलकर्णी यांना गौरवण्यात आले. क्लबचे अध्यक्ष जयजित परितकर, सचिव वीरेंद्र पाटील, राजन राजोपाध्ये, गणेश पाटील राजेंद्र मेढेेकर, प्रवीण गोडबोले, सुहास जनाज, संजीव पाटील, जावेद महात, सुरेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.