सवारी ड्रायव्हिंग स्कूलतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:48+5:302021-08-17T04:31:48+5:30
इस्लामपूर येथे सवारी ड्रायव्हिंग स्कूलच्यावतीने आनंदराव पवार, विक्रम पाटील यांच्याहस्ते सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शकील सय्यद, शाकीर ...

सवारी ड्रायव्हिंग स्कूलतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान
इस्लामपूर येथे सवारी ड्रायव्हिंग स्कूलच्यावतीने आनंदराव पवार, विक्रम पाटील यांच्याहस्ते सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शकील सय्यद, शाकीर तांबोळी, युनुस पटेल, शरीफ पठाण उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील सवारी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्यावतीने देशासाठी कार्य केलेल्या माजी सैनिक, कोविड परीस्थितीमध्ये काम केलेल्या कोविड योध्द्यांचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, नगरसेवक विक्रम पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेवक शकील सय्यद ,शाकीर तांबोळी उपस्थित होते. माजी लष्करी अधिकारी युनुस पटेल, माजी सैनिक कृष्णा पाटील, सर्प मित्र इन्नूस मणेर, सामाजिक कार्यकर्ते अमोल ठाणेकर, भगवान कांबळे यांचा सत्कार झाला, तसेच ज्येष्ठ नागरिक इस्माईल पठाण यांचा ७५ व्या वाढदिवसनिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी सवारी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे शरीफ पठाण, शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, संजय गांधी निराधार योजना सदस्य राहुल टिबे, राजेश पोळ, सलमान पठाण, राजेंद्र पवार, राजेंद्र पाटील, अनंत नाईक, शुभम पाटील, अरीफ मुल्ला उपस्थित होते.