कांदे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:53+5:302020-12-11T04:53:53+5:30

मांगले : कांदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील होतकरू शिक्षकांमुळे शिष्यवृती परीक्षेत चार मुली सांगली जिल्ह्यात चमकल्या, याचा तालुक्यालाही अभिमान ...

Honoring the meritorious students of Onion School | कांदे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कांदे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मांगले : कांदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील होतकरू शिक्षकांमुळे शिष्यवृती परीक्षेत चार मुली सांगली जिल्ह्यात चमकल्या, याचा तालुक्यालाही अभिमान आहे, असे गौरवोद्गार शिराळा पंचायत समितीच्या सभापती वैशालीताई माने यांनी काढले.

कांदे (ता. शिराळा) येथील चार मुली पूर्व उच्च माध्यमिक परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकल्या होत्या. या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सभापती वैशालीताई माने यांच्याहस्ते व गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, शिक्षणविस्तार अधिकारी व्ही. के. दळवी, केंद्रप्रमुख तानाजी माने यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला. यावेळी त्या बोलत होत्या.

प्रणाली हरिश्चंद्र ठाकर, स्वरांजली संजय कुंभार, धनश्री बाबासाहेब पाटील, श्रेया कुंभार व हर्षदा दादासाहेब पाटील यांनी यश संपादन केले. यावेळी मुख्याध्यापक वसंत कुंभार, संजय पाटील, धोंडीराम शिंदे, राजू जाधव, तेजस्विनी देशपांडे महादेव लोहार, वर्षा हावलदार आदी उपस्थित होते.

फोटो-१०मांगले०१

Web Title: Honoring the meritorious students of Onion School